Join us  

अंबानी आता थेट नेटफ्लिक्स-ॲमेझॉनला भिडणार, जिओ सिनेमावर आता मिळणार हॉलिवूड कंटेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 6:06 PM

गेम्स ऑफ थ्रोन्सपासून हॅरिपॉटरपर्यंत हॉलिवूडच्या अनेक मुव्ही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

तुम्ही सध्या ज्या प्लॅटफॉर्मवर आयपीएल (IPL 2023) पाहत आहात, त्या प्लॅटफॉर्मवर लवकरच तुम्हाला हॉलीवूडचा कंटेंटही पाहायला मिळेल. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपच्या ब्रॉडकास्ट व्हेन्चरनं वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीसोबत करार केला आहे. रिलायन्स ही डील त्याच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओ सिनेमासाठी (JioCinema) करत आहे. या डीलमुळे तुम्ही जिओ सिनेमावर हॉलिवूड कंटेंट पाहू शकाल. यामुळे जिओ सिनेमा थेट नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइमशी स्पर्धा करू शकणार आहे.

"रिलायन्सच्या वायकॉम-18 चा वॉर्नर ब्रदर्स आणि एचबीओ कंटेंटसोबतचा करण्यात आलेला करार जिओ सिनेमा ॲपवर हॉलीवूड कंटेंट उपलब्ध करेल. यामध्ये वेब सिरीज आणि सक्सेशन, गेम ऑफ थ्रोन्स, लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि हॅरी पॉटर सारख्या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे,” असं कंपनीनं दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

नेटवर्क 18 चे शेअर्स वाढलेया बातमीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया युनिट नेटवर्क18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंटच्या (Network18 Share) शेअरमध्ये बरीच वाढ झाली. बीएसईवर हा शेअर 6.43 टक्क्यांनी वाढून 58.56 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान शेअर 62.51 रुपयांपर्यंत गेला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 117.40 रुपये आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने या कराराची माहिती दिली होती. हा करार किती किमतीत होत आहे याची माहिती मात्र समोर आलेली नाही. परंतु निवेदनात, या कंटेंट भागीदारीचं वर्णन 'न्यू मल्टी इयर ॲग्रीमेंट' असं करण्यात आलं असून ते पुढील महिन्यापासून सुरू होईल.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीहॉलिवूड