नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला तरी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यंदा ३७.३ अब्ज डॉलरची भर पडली आहे. ‘फोर्बेस इंडिया’ने जारी केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ते सलग १३व्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असलेली पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’ पहिल्यांदाच सर्वोच्च-१० श्रीमंतांच्या यादीत आली आहे. यादीत प्रथम स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे ८८.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये २० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्यामुळे त्यांच्या कंपनीसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. गुंतवणूकदारांत फेसबुक आणि गुगल यासारख्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.भारतातील टॉप-२० श्रीमंत आणि संपत्ती (डॉलरमध्ये)१. मुकेश अंबानी - ८८.७ अब्ज२. गौतम अदानी - २५.२ अब्ज३. शिव नाडर - २०.४ अब्ज४. राधाकिशन दमानी- १५.४ अब्ज५. हिंदुजा ब्रदर्स - १२.८ अब्ज६. सायरस पूनावाला - ११.५ अब्ज७. पालनजी मिस्री - ११.४ अब्ज८. उदय कोटक - ११.३ अब्ज९. गोदरेज फॅमिली - ११ अब्ज१०. लक्ष्मी मित्तल - १०.३ अब्ज११. सुनील मित्तल - १०.२ अब्ज१२. दिलीप शांघवी - ९.५ अब्ज१३. बर्मन फॅमिली -९.२ अब्ज१४. कुमार बिर्ला - ८.५ अब्ज१५. अजीम प्रेमजी - ७.९ अब्ज१६. बजाज फॅमिली - ७.४ अब्ज१७. मधुकर पारेख - ७.२ अब्ज१८. कुलदीप व गुरबचनसिंग धिंग्रा- ६.८ अब्ज१९. सावित्री जिंदाल - ६.६ अब्ज२०. मुरली दिवी - ६.५ अब्ज
मुकेश अंबानी सलग १३व्या वर्षी सर्वांत श्रीमंत; दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:17 AM