Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani: मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले

Mukesh Ambani: मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले

अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते. तसाच काहीसा प्रकार एक चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीसोबत घडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:46 PM2022-12-31T14:46:05+5:302022-12-31T14:47:02+5:30

अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते. तसाच काहीसा प्रकार एक चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीसोबत घडला आहे.

Mukesh Ambani set to become Chocolate Boy; Reliance Retail will ready to deal with Lotus Chocolate Company Ltd 72 percent stake | Mukesh Ambani: मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले

Mukesh Ambani: मुकेश अंबानी चॉकलेट बॉय बनण्याच्या तयारीत; अनेकांची शुगर वाढवत नव्या वर्षातील खरेदीला निघाले

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे गेल्या काही वर्षांपासून रिटेल क्षेत्रात मोठा विस्तार करण्यात गुंतले आहेत. अंबानी ज्या गोष्टीवर हात ठेवतात त्याचे सोने होते. तसाच काहीसा प्रकार एक चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीसोबत घडला आहे. रिलायन्स रिटेल (Reliance Retail) या चॉकलेट कंपनीमध्ये ५१ टक्क्यांची मालकी खरेदी करणार असल्याचे वृत्त आले आणि कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. 

शुक्रवारी या चॉकलेट कंपनीच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले. या कंपनीचे नाव आहे Lotus Chocolate Company Ltd. या कंपनीचे शेअर्स रिलायन्सचे नाव येताच पाच टक्क्यांनी वाढले. हा शेअर 5.85 रुपयांनी वाढून १२२.९५ रुपयांवर गेला. रिलायन्स ही कंपनी विकत घेणार असल्याचे समजताच गुंतवणूकदारांच्या शेअर्सवर उड्या पडल्या आहेत. 

मुकेश अंबानी सर्वेसर्वा असले तरी रिलायन्स रिटेल व्हेंचरची जबाबदारी मुलगी ईशा अंबानीकडे आहे. तिच्या साथीने अंबानी सातत्याने व्यवसाय वाढवत निघाले आहेत. रॉयटर्सच्या मते, रिलायन्स रिटेल लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमधील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयार आहे. यासाठी 113 रुपये प्रति शेअरची किंमतही निश्चित करण्यात आली आहे.

लायन्स रिटेल आणि लोटस चॉकलेटमधील हा करार जवळपास $8.94 दशलक्षमध्ये होणार आहे. यासोबतच ओपन ऑफरद्वारे अतिरिक्त 26 टक्के स्टेक खरेदी करण्याची तयारी आहे. सध्या चॉकलेट कंपनीमध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे ७२ टक्के हिस्सा आहे. लोटस या चॉकलेट कंपनीची स्थापना 1988 मध्ये झाली. ही कंपनी कोक आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते.

Web Title: Mukesh Ambani set to become Chocolate Boy; Reliance Retail will ready to deal with Lotus Chocolate Company Ltd 72 percent stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.