मुंबई : जगातील श्रीमंतांची यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सातव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या १० स्थानांमध्ये असलेले ते एकमेव आशियाई व्यक्ती आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीमध्ये अंबानी यांचे स्थान दोनने घसरले आहे. या आधीच्या यादीत ते पाचव्या स्थानावर होते. आता त्यांच्या आधी गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफेट आणि इलॉन मस्क यांचा क्रमांक लागत आहे.अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने एप्रिल महिन्यांपासून १,५२,०५६ कोटी रुपये हे विविध संस्थांच्या मार्फत उभारले असून, त्यामुळे या कंपनीचे शेअर जोरदार उसळी घेऊन पुढे जात आहेत. याचा फायदा अंबानी यांची मालमत्ता आणखी वाढण्यामध्ये दिसून आला.गुंतवणूक तज्ज्ञ असलेले वॉरेन बफेट यांची मालमत्ता वाढली असून, ते या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इलॉन मस्क यांची मालमत्ता टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या कंपनीच्या शेअर्समुळे वाढली असून, त्यांनी अंबानींच्या आधी सहावा क्रमांक पटकावला आहे.
जगातील श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी सातवे, दोन स्थानांनी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 2:43 AM