Join us

मुकेश अंबानींनी 'ब्रिटिशां'नाही मागे टाकले; रिलायन्स पेट्रोलियमने रचला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:33 PM

मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर झाली होती.

नवी दिल्ली : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने बुधवारी नवा इतिहास रचला आहे. मंगळवारी 9.5 लाख कोटींचे बाजारमूल्य कमावणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. यानंतर बुधवारी ब्रिटिश पेट्रोलियम (BP) ला मागे टाकत तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

 मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्सचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर झाली होती. तर ब्रिटिश पेट्रोलियमचे बाजारमूल्य 138 अब्ज डॉलर होते. यंदा रिलायन्सच्या शेअरमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. 

अंबानी यांनी पुढील 18 महिन्यांमध्ये कर्ज शून्य करण्यासाठी तेल ते केमिकल व्यापारातील हिस्सेदारी सौदी अरामको विकली होती. अन्य उपायही केले होते. या घोषणेनंतर ही वाढ झाली आहे. ब्ल्यूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार शेअरच्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढून 56 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे त्यांनी जॅक मा यांनाही मागे टाकले आहे. 

गेल्या महिन्याच्या शेवटी काही काळासाठी रिलायन्सने ब्रिटिश पेट्रोलियमला मागे टाकले होते. मात्र, बुधवारी जोरदार मुसंडी मारत पुन्हा मागे टाकले आहे. रिलायन्सच्या मुल्यानुसार आशियाची सर्वांत मोठी पेट्रोलियम कंपनी पेट्रोचायना दरम्यानचे अंतरही वेगाने कमी होत चालले आहे. 

टॅग्स :रिलायन्सपेट्रोलशेअर बाजार