Join us  

दिवाळीपूर्वीच Jio सारखा आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, जाणून घ्या काय आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:50 PM

ही कंपनी याच वर्षी दिवाळीच्या आधी शेअर मार्केटमध्ये लिस्ट देखील केली जाऊ शकते.

नवी दिल्ली - भारत आणि आशिया खंडातील सर्वात श्रमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दिवाळी पूर्वीच एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आपल्या नॉन-बँक लेंडिंग आणि फायनांशिअल सर्व्हिसेस युनिट्स वेगळे करत आहे. यासाठी जिओ फायनांशिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) नावाणे एक वेगळी कंपनी तयार केली जाईल. एवढेच नाही, तर ही कंपनी याच वर्षी दिवाळीच्या आधी शेअर मार्केटमध्ये लिस्ट देखील केली जाऊ शकते.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, यासाठी आवश्यक अप्रूव्हल घेण्यासाठी रेग्युलेटर्ससोबत चर्चा सुरू आहे. कंपनीने आपल्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी दोन मे रोजी शेअरहोल्डर्स आणि क्रेडिटर्सची मिटिंग बोलावली आहे. रिलायन्सच्या या नव्या कंपनीत रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स (Reliance Payments Solutions), जिओ पेमेंट्स बँक (Jio Payments Bank), रिलायन्स रिटेल फायनान्स (Reliance Retail Finance) आणि रिलायन्स रिटेल इंश्योरन्स ब्रोकिंग (Reliance Retail Insurance Broking) यांचा समावेश केला जाईल. तज्ज्ञांच्या मते यामुळे बँक, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांना मोठे आव्हान मिळू शकते.

डिमर्जर योजनेनुसार, रिलायन्सच्या सध्याच्या भागधारकांना एका शेअरसाठी नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. कंपनीच्या बोर्डाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डिमर्जरला मंजुरी दिली होती. के व्ही कामथ यांना नवीन एंटिटीचे नॉन-एक्झिक्यूटिव्ह चेअरमन बनवण्या आले होते. McLaren Strategic Ventures मध्ये टॉप एक्झिक्यूटिव्ह राहिलेले हितेश सेठिया यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका प्रतिनिधीने यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला आहे. 

प्लॅननुसार, ग्रुपचे  नॉन बँक लेंडर रिलायन्स स्ट्रॅटजिक इनव्हेस्टमेंटचा (RSIL) इक्विटी शेअर रिलायन्सच्या सध्याच्या शेअरहोल्डर्सना 1:1 रेशोनुसार जारी करण्यात येतील. हिचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केले जातील आणि डिमर्जरनंतर, तयार होणाऱ्या कंपनीचे नाव जिओ फायनांशियल सर्व्हिसेस असे असेल. यामुळे पेटीएम आणि बजाज फायनान्सला मोठी टक्कर मिळू शकते.

टॅग्स :मुकेश अंबानीजिओरिलायन्सव्यवसाय