Join us  

Reliance FMCG Investment : हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, कोका-कोला, अदानी विल्मरला अंबानी टक्कर देणार; रिलायन्सनं बनवला प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:59 PM

Reliance FMCG Investment : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सनं भारतीय फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स मार्केटमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, कोका-कोला, अदानी विल्मर आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे.

Mukesh Ambani Reliance News : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सनं भारतीय फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स मार्केटमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, कोका-कोला, अदानी विल्मर आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत रिलायन्स एफएमसीजी युनिटमध्ये ३९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स आपल्या एफएमसीजी युनिटमध्ये इक्विटी आणि डेटच्या माध्यमातून ३,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. आरसीपीएलनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडील (ROC)  फायलिंगमध्ये, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या (RCPL) संचालक मंडळानं २४ जुलै रोजी झालेल्या एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये बिझनेस ऑपरेशन्ससाठी निधी गोळा करण्यासाठी एकमतानं विशेष ठराव मंजूर केल्याचं म्हटलं. नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाल्यापासून रिलायन्सची एफएमसीजी युनिटमधील ही सर्वात मोठी भांडवली गुंतवणूक असेल.

स्वस्त किंमतीत हाय क्वालिटी प्रोडक्ट

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आरसीपीएलनं याच डिबेंचर मार्गानं २६१ कोटी रुपये उभे केले. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका ईशा अंबानी यांनी आठवडाभरापूर्वी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना, कन्झुमर ब्रँड व्यवसायात कंपनी संपूर्ण भारतात जास्तीत जास्त वापरास प्रोत्साहन देण्यासाठी परवडणाऱ्या किंमतीत उच्च गुणवत्तेची उत्पादनं तयार करण्यावर लक्ष केंद्रित करीत असल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी