मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट पटकावला आहे. गौतम अदानी यांनी काही महिन्यांपूर्वी तो अंबानींकडून हिरावून घेतला होता. आता पुन्हा अंबानींनी तो मिळविला आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर लिस्टमध्ये गुरुवारी दुपारपर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 3.1 अब्ज डॉलर एवढी वाढली होती. तर गौतम अदानी यांची संपत्ती 1.3 अब्ज डॉलर घटली होती.
या घसरणीमुळे अदानी सहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आले तर मुकेश अंबानी सहाव्या क्रमांकावर गेले. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर लिस्टमध्ये जगभरातील पहिल्या १० अब्जाधीशांची नावे आहेत. रिलायन्स इंडयस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3.22 टक्क्यांची वाढ झाली. तर अदानींच्या शेअरमध्ये वाढ दिसली नाही. अदानी एंटरप्राइजेज 1.59 टक्के, अदानी पोर्ट 0.55 टक्के, अदानी विल्मर 4.99 टक्के वाढला आहे, तर अदानी पावर 3.03 टक्क्यांनी घसरला आहे.
फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत अदानीची एकूण संपत्ती $100.5 अब्ज होती. तर, अंबानींची $101.2 अब्ज. एलन मस्क $ 225.5 अब्ज संपत्तीसह प्रथम स्थानावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट 156.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $१४७.४ अब्ज आहे. बिल गेट्स १२७.७ अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत.