Join us

अंबानींचा मास्टर प्लॅन! व्यवसाय मुलांच्या ताब्यात देऊन मुकेश अंबानी नवा बिझनेस करणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 5:41 PM

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेला रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपन्यांची जबाबदारी आता मुलांच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे.

देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेला रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपन्यांची जबाबदारी आता मुलांच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे, मुलांच्या ताब्यात जबाबदारी देऊन आपण स्वत: नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत अंबानी असल्याचे बोलले जात आहे.

मुकेश अंबानी यांनी आधीच आपला व्यवसाय आपल्या तीन मुलांमध्ये विभागला आहे. मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे टेलिकॉम व्यवसायाची कमान सोपवण्यात आली आहे तर रिटेल व्यवसायाची जबाबदारी मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लहान मुलगा अनंत अंबानी यांच्याकडे रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्सची जबाबदारी दिली आहे. एका अहवालानुसार, 65 वर्षीय मुकेश अंबानी आता हरित ऊर्जेवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत. अंबानी यांनी गेल्या वर्षी या संदर्भात जाहीर ेकेल होते. कंपनी ग्रीन एनर्जी व्यवसायात पुढील 15 वर्षांत तब्बल 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. रिलायन्सने 2035 पर्यंत कार्बन नेट-झिरो कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या अहवालात मुकेश अंबानी हरित ऊर्जेशी संबंधित कंपनीची रणनीती पाहणार आहेत. यामध्ये गिगा कारखाने आणि ब्लू हायड्रोजन सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे. अधिग्रहणाद्वारे कंपनीचा विस्तार होईल. तसेच संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चा केली जात आहे. मुकेश अंबानी हे कोणत्याही प्रकल्पावर मनापासून काम करण्यासाठी ओळखले जातात. 1990 मध्ये त्यांनी पेट्रोलियम व्यवसायासाठी रात्रंदिवस काम केले. यानंतर गेल्या दोन दशकांत त्यांचा भर टेलिकॉम व्यवसायावर होता.

आता मुकेश अंबानी यांचे लक्ष ग्रीन एनर्जीवर आहे, तिथे त्यांचा सामना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याशी होईल. अदानी यांनी अक्षय ऊर्जा व्यवसायासाठी 70 डॉलर अब्ज गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. अदानी सध्या भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आहेत. तर मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांना हरित ऊर्जा क्षेत्रात काम करायचे आहे, याअगोदर त्यांनी दूरसंचार क्षेत्रात काम केले. त्यांची कंपनी रिलायन्स जिओने 2016 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आणि आज ती देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे.

'हरित ऊर्जेमध्ये कंपनीची गुंतवणूक हळूहळू सुरू होईल आणि पुढील काही वर्षांत वाढेल. समूहाने गुजरातमधील जामनगर येथील धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्समध्ये चार गिगा कारखान्यांचे बांधकाम सुरू केले आहे. रिलायन्स ग्रीन हायड्रोजन अर्थव्यवस्थेची संपूर्ण मूल्य साखळी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. कंपनीला यात भविष्य दिसत आहे. 

1000 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी बातमी, तुमच्या जवळही असेल तर मिळतील पूर्ण 3 लाख रुपये!

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला हरित ऊर्जेचे उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनवण्याची घोषणा केली होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये भारताला ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :व्यवसायमुकेश अंबानीरिलायन्सजिओ