मुंबई - रिलायन्सने जियोफोन नेक्स्टसाठी लिमिटेड पीरियड एक्स्चेंज टू अपग्रेड ऑफर लॉन्च केली आहे. ४जी फिचर फोनच्या सध्याच्या युझर्सना आता जगातील सर्वात किफायतशीर ४जी स्मार्टफोनवर मोठ्या स्क्रिनवर डिजिटल अनुभव अधिक सहजपणे मायग्रेट करता येईल. या फोनची किंमत ६ हजार ४९९ रुपये असून, हा फोन तुम्ही कशाप्रकारे २ हजार रुपये स्वस्तात खरेदी करू शकता, हे पुढे जाणून घ्या.
जियो फोन नेक्स्टच्या भारतातील किमतीचा विचार केल्यास ही किंमत कंपनीने ६ हजार ४९९ रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र कंपनी जुन्या ४जी फोनला एक्स्चेंज केल्यावर त्वरित दोन हजार रुपयांची सवलत देत आहे. डिस्काऊंटचा फायदा मिळाल्यानंतर जियो फोन नेक्स्ट केवळ ४ हजार ४४९ रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.
त्याच प्रमाणे सध्याच्या ४जी लो-अँड स्मार्टफोन युझर्ससुद्धा जियो फोन नेक्स्टद्वारे एक सहज आणि अॅडव्हान्स डिजिटल लाईफ ऑफरमध्ये अपग्रेड करू शकतात. अँड्रॉईडचे ऑप्टिमाइज्ड व्हर्जन असल्याने युझर्स कुठल्याही व्यत्ययाविना सर्व अॅप वापरू शकाल. ही ऑफर रिलायन्स रिटेलच्या जियो मार्ट डिजिटल आणि रिलायन्स डिजिटल स्टोअर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागातही उपलब्ध आहे.