Join us  

Reliance: मुकेश अंबानी दिवाळीत मोठा धमाका करणार, बडी कंपनी खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 3:50 PM

Reliance Retail: देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी उद्योग जगतात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई - देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी उद्योग जगतात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी यांची नजर एका मोठ्या कंपनीवर आहे. आपला रिटेल बिझनेस वाढवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी केरळमधील इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रोसरी रिटेल चेन बिस्मीचे अधिग्रहण करण्याची तयारी सुरू केली आहे. रिलायन्स रिलेट हा व्यवहार पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी सातत्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन मोठे व्यवहार केले आहेत. तसेत आता एक अजून कंपनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडली जाणार आहे. बिस्मीचे राज्यामध्ये ३० मोठे फॉर्मेट स्टोअर आहेत. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार या सौद्याशी संबंधित दोन सीनियर एक्झिक्युटिव्हनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत या डीलवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

मुकेश अंबानी खरेदी करत असलेली ही कंपनी उद्योगपती व्हीए अजमल यांच्या मालकीची आहे. अजमल हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनीची धुरा सांभाळत आहेत. या कंपनीचे एकूण मूल्य हे ८०० कोटी रुपये आहे. तर अजमल हे ६०० कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनची मागणी करत आहेत. मात्र या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे.

दरम्यान, रिलायन्स रिटेलला पाठवलेल्या ईमेलं अद्याप उत्तर आलेलं नाही. त्याशिवाय बिस्मीच्या एमडी यांनी कुठल्याही प्रकारच्या चर्चांवर टिप्पणी करण्यावर नकार दिला आहे. रिलायन्सने हल्लीच काही मोठ्या डील्स केल्या आहेत. त्यामध्ये कॅम्पाकोला कंपनीसोबतचा व्यवहार आणि पॉलिस्टर चिप आणि धागा बनवणाऱ्या शुभलक्ष्मी पॉलिएस्टर लिमिटेडचं अधिग्रहण उद्योग जगतात चर्चेचा विषय ठरले होते. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसाय