Join us  

Mukesh Ambani Jio : ‘या’ क्षेत्रात अंबानी खेळणार Jio वाली खेळी; साबणापासून कोल्डड्रिंक, सर्वकाही मिळणार स्वस्तात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:17 PM

मुकेश अंबानींच्या या प्लॅनमुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांप्रमाणेच या क्षेत्रातील विद्यमान कंपन्यांचे धाबे दणणार?

Mukesh Ambani Jio : काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सजिओनं एन्ट्री केल्यानंतर दूरसंचार क्षेत्राचे धाबे दणाणले होते. त्यांच्या एन्ट्रीनंतर काही कंपन्यांना आपला कारभार गुंडाळावा लागला होता. आता अशीच काहीशी खेळी ते एफएमजीसी सेक्टरमध्येही खेळण्याच्या तयारीत आहेत. कॅम्पा कोलासारख्या ब्रँड्सना पुन्हा बाजारात लाँच करण्यासोबतच रिलायन्स आता प्रोडक्ट्सच्या किंमती ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत स्वत करत सध्याच्या एफएमजीसी कंपन्यांच्या समस्या वाढवल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या कॅम्पा कोलाची किंमत आधीपासूनच कमी आहे. 

रिलायन्स झटका देण्याच्या तयारीत तज्ज्ञांच्या मते, रिलायन्सचं हे पाऊल अनेक कंपन्यांसाठी अनेक अडचणी निर्माण करू शकतं. याचं कारण म्हणजे महागाई पाहता रिलायन्सच्या कमी किमतीच्या धोरणामुळे लोक आकर्षित होतील आणि त्यांना खरेदी करायला आवडेल. जर ग्राहकांना गुणवत्ता चांगली आहे असे वाटत असेल तर ती उत्पादने पुन्हा वापरतील, अन्यथा नाही. सध्या, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या RCPL ची उत्पादनं काही मोजक्याच बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. ही उत्पादनं पॅन इंडिया लेव्हलवर नेण्यासाठी कंपनी एक डीलरशिप नेटवर्क स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहे.

काय सुरुये तयारी?जाणकारांच्या मते रिलायन्स एक डेडीकेटेड डिस्ट्रिब्युशन नेटवर्क उभारण्याची तयारी करत आहे. यात ट्रेडिशनल डीलर आणि स्टॉकिस्टसोबत मॉडर्न बी२बी चॅनलही ॲड केला जाईल. रिलायन्सची मोठ्या काळापसून ११० अब्ज डॉलर्सच्या या क्षेत्रावर नजर आहे. सध्या यात हिंदुस्तान युनिलिव्हर, पीएंडजी, नेस्लेसारख्या कंपन्यांचा होल्ड आहे. तर दुसरीकडे टाटादेखील या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.

वस्तू ३५ टक्के स्वस्तदुसरीकडे, रिलायन्सनं आंघोळीच्या साबणापासून ते डिटर्जंट पावडर आणि डिश बारपर्यंतची उत्पादनं बाजारात आणली आहेत. ज्यांच्या किमती इतर कंपन्यांच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी आहेत. याशिवाय रिलायन्सनं तीन नवीन फ्लेवर्ससह कॅम्पा कोला बाजारात आणलं आहे. त्यामुळे पेप्सी आणि कोका कोलाला मोठं आव्हान मिळू शकतं.

जिओच्या प्लॅनिंगचा वापररिलायन्स आपल्या त्याच धोरणाचा वापर करतंय ज्याचा वापर त्यांनी एकेकाळी टेलिकॉम सेक्टरसाठी केला होता, असं टेक्नोपार्क ॲडव्हायझर्सचे चेअरमन अरविंद सिंघल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. जिओनं बाजारात एन्ट्री घेत टेलिकॉम क्षेत्रात एक क्रांती आणली होती. रिलायन्स आता तेच धोरण वापरत आहे. परंतु यात थोडा फरक आहे, या ठिकाणी त्यांना क्वालिटीवर लक्ष द्यावं लागणार आहे. त्यात जराही चूक झाली तर डाव उलटा पडू शकतो, असंही त्यांनी नमूद केलंय.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीजिओ