Join us  

मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा; कोण आहे अंबानींची सून राधिका मर्चंट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 2:46 PM

अंबानी कुटुंबाने आणखी एक गुडन्युज दिली आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा आज पार पडला.

अंबानी (Ambani) कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. नुकतीच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची लेक ईशा अंबानी आपल्या दोन्ही मुलांसह घरी आली. तिचे जंगी स्वागत करण्यात आले. आता नुकतीच अंबानी कुटुंबाने आणखी एक गुडन्युज दिली आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा आज राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात पार पडला. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अनंत आणि राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार 

राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्यासोबत अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एंकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चंट यांची राधिका ही मुलगी आहे. राधिका उत्तम नृत्यांगना आहे. अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लवकरच राधिका अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत.  यामध्ये दोघेही आनंदात दिसत असून सर्व मित्रपरिवार या सोहळ्यात सहभागी झाला आहे.

राधिका विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये त्यांची गणना होते. राधिकाने तिचे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले आहे. यानंतर ती उच्च शिक्षणासाठी न्युयॉर्कमध्ये गेली. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रात तिने शिक्षण घेतले. २०१७ मध्ये तिने इसप्रावा टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. 

राधिका शास्त्रीय नृत्यातही पारंगत आहे. जून २०२२ मध्ये अंबानी कुटुंबाने राधिकाच्या अरंगेत्रम सेरेमनीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवुड कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. 

टॅग्स :मुकेश अंबानीलग्नपरिवार