मुंबई : उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि विशेषत: गुजरात येथील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारल्याबद्दल विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना नुकतेच प्रतिष्ठेच्या ‘आॅथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘द केमिकल हेरिटेज फाऊंडेशन’ च्या वतीने अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने अंबानी यांना गौरविण्यात आले. केमिकल हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष कार्स्टन रेनहार्डट् आणि डेल्फी आॅटोमोटिव्हचे अध्यक्ष राज गुप्ता यांच्याहस्ते मुकेश अंबानी यांचा हा गौरव करण्यात आला.
या पुरस्काराचे श्रेय आपले वडील स्व.धीरुभाई अंबानी यांना देताना मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स केवळ वस्त्रोद्योगात होती त्यावेळी धीरूभाईंनी केमिकल इंजिनियर होण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिले. तसेच, यावेळी भारत आणि अमेरिका संबंधावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, २१ साव्या शतकात आपल्याला दोन प्रमुख मुद्यांच्या विरोधात लढा द्यावा लागणार आहे.
यापैकी पहिला लढा असेल तो सुबत्ता आणि चांगले आयुष्य जगता यावे म्हणून गरिबी आणि अनुषंगिक परिस्थितीच्या विरोधीतील आणि दुसरा लढा असेल ते गुणवत्तेच्या शोधाचे. भारत आणि अमेरिका यांचे दृढ संबंध या दोन्ही लढ्यात विजय प्राप्त करू शकतात, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मुकेश अंबानी यांचा ‘आॅथमर गोल्ड मेडल’ने गौरव
उद्योगपती मुकेश अंबानी यांना नुकतेच प्रतिष्ठेच्या ‘आॅथमर गोल्ड मेडल फॉर आन्थ्रप्रुनियल लीडरशीप’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
By admin | Published: May 18, 2016 05:48 AM2016-05-18T05:48:10+5:302016-05-18T05:48:10+5:30