Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी त्यांच्या JioCinema ची व्याप्ती वाढवण्यार भर देत आहेत. यासाठी त्यांनी मोफत आयपीएल दाखवणे, वॉर्नर ब्रोसोबत करार करण्यासारखी पाऊले उचलली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता त्यांनी गुगलचे माजी जनरल मॅनेजर किरण मणी यांची जिओ सिनेमाचे CEO म्हणून नियुक्ती केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जिओ सिनेमाचे ग्राहक वाढवण्यासाठी किरण मणी यांची महत्वाची भूमिका असेल. किरण मणी यापूर्वी आशिया पॅसिफिक प्रदेशात Google चे Android ऑपरेशन्स हेड होते. पण, आता जिओ सिनेमामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि हॉलिवूड स्टुडिओसोबत पार्टनर्शिप, यांसारखी महत्वाची कामे पाहतील.
यापूर्वी इथे काम केले
किण मणी यांच्या लिंक्डइन पेजनुसार, त्यांनी यापूर्वी Google मध्ये काम केले आहे. तसेच, त्यांनी जेम्स मर्डोक आणि उदय शंकर यांच्या बोधी ट्री गुंतवणूक फर्मचे गुंतवणूकदार आणि सल्लागार देखील होते. विशेष म्हणजे, JioCinema ची मूळ कंपनी Viacom18, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पॅरामाउंट ग्लोबल आणि बोधी ट्री यांच्यातील जॉईंट व्हेंचर आहे.
भारत सर्वांच्या पसंतीचा देश
1.4 अब्ज लोकसंख्या असलेला भारत जागतिक मीडिया कंपन्यांसाठी सर्वात पसंतीचा देश आहे. सध्या भारतात अनेक स्ट्रीमिंग सर्व्हिस उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जिओ सिनेमाला त्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी मणी यांची मोठी मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, JioCinema ने यावर्षी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज Warner Bros. Discovery Inc. आणि Comcast Corp च्या NBCUniversal सोबत प्रोग्रामिंग करारांवर स्वाक्षरी केली.