Join us  

Mukesh Ambani यांचा मोठा डाव, दिवाळखोरीत गेलेली Sintex कंपनी खरेदी करण्याची केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 3:46 PM

Mukesh Ambani News: देशातील सर्वात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवाळखोरीत गेलेली सिंटेक्स कंपनी खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दिले आहे.

मुंबई - देशातील सर्वात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवाळखोरीत गेलेली सिंटेक्स कंपनी खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दिले आहे. याशिवाय सिंटेक्सची खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये आदित्य बिर्ला अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीची गुंतवणूक असलेल्या वार्ड कॅपिटल, वेलस्पन ग्रुपची एक कंपनी, इडलवाइज ऑल्टरनेटिव्ह अॅसेट्स अॅडव्हायझर्स, ट्रायडेंट लिमिटेड आणि इंडोकाऊंट इंडस्ट्रीज यांचाही समावेश आहे. फॅब्रिक बिझनेसशी संबंधित सिंटेक्समध्ये Ares SSG कॅपिटलची मोठी भागीदारी आहे. सिंटेक्स कंपनीच्या वेबसाईटनुसार कंपनी Armani, Hugo Boss, Diesel आणि Burberry सारख्या ग्लोबल फॅशन ब्रँड्सला फॅब्रिक सप्लाय करते.

सिंटेक्स इंडस्ट्रिज कॉर्पोरेशन इनसॉल्वेंसीं अँड रिझॉल्युशन प्रोसेसच्या माध्यमातून जात आहे. सिंटेक्स इंडस्ट्रीज विरुद्ध यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये एनसीएटीच्या अहमदाबाद ब्रँचमधून इनसॉल्व्हेंसीची प्रोसेस सुरू झाली होती. ही कंपनी सप्टेंबर २०१९ मध्ये में Invesco Asset Management (India) Pvt Ltdचे १५.४ कोटी रुपयांचे बिल जमा करण्यात अपयशी ठरली होती. कंपनीच्या रिझॉल्युशन प्रोफेशनलने २७ फायनान्शियल क्रेडिटर्सचे ७ हजार ५३४.६ कोटी रुपयांचा दावा स्वीकार केला होता.

सिंटेक्सवर विविध बँकांचे कर्ज आहे. तर पीएनबी, पंजाब आणि सिंध बँक आणि कर्नाटका बँकेने कंपनीच्या अकाऊंटला फ्रॉड घोषित केले आहे. २०१७ मध्ये सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजीला सिंटेक्स इंडस्ट्रीजमधून वेगळे करण्यात आले होते. सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी वॉटर स्टोरेज टँक तयार करते. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने आलोक इंडस्ट्रीसाठी बोली लावली होती. त्यानंतर या कंपनीचे अधिग्रहण केले होते. रिलायन्सने कुठल्याही दिवाळखोर कंपनीसाठी बोली लावण्याची ही एकमेव वेळ होती.  

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स