Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींची लेक होणार पिरामल कुटुंबाची सून, डिसेंबरमध्ये शुभमंगल

अंबानींची लेक होणार पिरामल कुटुंबाची सून, डिसेंबरमध्ये शुभमंगल

अंबानी आणि पिरामल या दोन कुटुंबांमधील अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर आता नात्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 04:41 PM2018-05-06T16:41:45+5:302018-05-06T16:41:45+5:30

अंबानी आणि पिरामल या दोन कुटुंबांमधील अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर आता नात्यात होणार आहे.

Mukesh Ambani’s daughter Isha Ambani gets engaged to Anand Piramal | अंबानींची लेक होणार पिरामल कुटुंबाची सून, डिसेंबरमध्ये शुभमंगल

अंबानींची लेक होणार पिरामल कुटुंबाची सून, डिसेंबरमध्ये शुभमंगल

मुंबईः देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा डिसेंबर महिन्यात पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. आनंद पिरामल याच्याशी तिची लगीनगाठ बांधली जाणार आहे. आनंद हा पिरामल समूहाचे संस्थापक अजय पिरामल यांचा चिरंजीव असून या दोन कुटुंबांमधील चार दशकांपासूनच्या मैत्रीचं आता नात्यात रूपांतर होतंय. रिलायन्स उद्योगसमूहाने औपचारिक पत्राद्वारे या लग्नाची घोषणा केली आहे.

महाबळेश्वरमधील एका मंदिरात आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. ईशाने त्याला होकार दिल्यानंतर, दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी सहभोजन करून हा आनंद साजरा केला होता. मार्च महिन्यात आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहता हिच्याशी झाला होता. त्या पाठोपाठ आता ईशाचंही शुभमंगल निश्चित झालंय. ईशा आणि आकाश ही जुळी भावंडं आहेत. आता त्यांचं लग्नही एकाच मांडवात होणार का, याबद्दल उत्सुकता आहे. ईशाचा लग्नसोहळा भारतातच होणार असल्याचं रिलायन्सच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.

गोव्यातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता. धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असल्यापासून या दोघांची मैत्री होती आणि हळूहळू तिचं रूपांतर प्रेमात झालं होतं. श्लोका ही हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. ती लवकरच अंबानी कुटुंबाची सून होईल आणि आनंद पिरामल हा अंबानींचा 'जमाई राजा'. त्यामुळे 'अँटिलिया'मध्ये येत्या काळात दोन लग्नांची धामधूम पाहायला मिळेल.

Web Title: Mukesh Ambani’s daughter Isha Ambani gets engaged to Anand Piramal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.