Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्चस्व! AI उद्योगात मुकेश अंबानींची एन्ट्री; अमेरिकन कंपनीसोबत झाली मोठी डील

वर्चस्व! AI उद्योगात मुकेश अंबानींची एन्ट्री; अमेरिकन कंपनीसोबत झाली मोठी डील

आमचे लक्ष्य देशातील संशोधक, स्टार्टअप आणि वेंचरसाठी एआय सुलभ बनवणे आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर हाऊस बनवण्याच्या दिशेने भारताची प्रगती आणखी वेगाने हाईल असं त्यांनी म्हटलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 12:27 PM2023-09-09T12:27:07+5:302023-09-09T13:23:20+5:30

आमचे लक्ष्य देशातील संशोधक, स्टार्टअप आणि वेंचरसाठी एआय सुलभ बनवणे आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर हाऊस बनवण्याच्या दिशेने भारताची प्रगती आणखी वेगाने हाईल असं त्यांनी म्हटलं.

Mukesh Ambani's entry into the AI industry; A big deal was made with an American company Nvidia | वर्चस्व! AI उद्योगात मुकेश अंबानींची एन्ट्री; अमेरिकन कंपनीसोबत झाली मोठी डील

वर्चस्व! AI उद्योगात मुकेश अंबानींची एन्ट्री; अमेरिकन कंपनीसोबत झाली मोठी डील

नवी दिल्ली – देशातील सर्वात श्रीमंत कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अलीकडेच झालेल्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस(AI) मॉडेलबाबत मोठा दावा केला होता. आता या दिशेने वेगाने पुढे जात मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स AI च्या दुनियेत स्वत:चा दबदबा कायम करण्यासाठी एक मोठी डील केली आहे. याअंतर्गत जियो प्लॅटफॉर्म्सने क्लाऊड आधारित AI कंप्यूटचा मूळ ढाचा बनवण्यासाठी जागतिक चिप डिझाईन कंपनी एनवीडियासोबत करार केला आहे.

रिलायन्स-Nvidia च्या कराराचा उद्देश काय?

रॉयटर्सनुसार, अमेरिकन चिप उत्पादन कंपनी एनवीडियासोबत करारामुळे भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि सेमीकंडक्टर चिपला चालना मिळेल. या भागीदारीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल सेवा उद्योगाला आणखी बळ मिळणार आहे. ज्यात जियो प्लॅटफॉर्म्सही येते. जियो प्लॅटफॉर्म्सकडून एका निवेदनात म्हटलंय की, AI Cloud ही या नवीन पायाभूत सुविधांमुळे देशभरातील संशोधक, विकासक, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ, एआय तज्ञांना कॅम्प्यूटिंग, हायस्पीड, सुरक्षित क्लाऊड नेटवर्किंगपर्यंत पोहचण्यास सक्षम बनवेल.

AI सुपर कॅम्प्यूटर दिशेने वाटचाल

एनवीडियाचे फाऊंडर आणि सीईओ जेनसेन हुआंग यांनी म्हटलं की, भारतात अत्याधुनिक एआय सुपर कॅम्प्युटर बनवण्यासाठी रिलायन्ससोबतच्या भागीदारीने आम्ही आनंदी आहोत. भारताकडे कौशल्य, डेटा आणि टॅलेंट आहे. सर्वात प्रगत AI संगणकीय पायाभूत सुविधेसह रिलायन्स स्वत: मोठ्या लॅग्वेंज मॉडेलचं निर्माण करू शकते. जे भारतातील लोकांना देशात बनणाऱ्या जेनरेटर एआय प्रयोगांसाठी मदत करतील.

कंपनीच्या माहितीनुसार, एनवीडिया ही योजना आवश्यक संगणकीय पॉवर प्रदान करेल. तर रिलायन्स एआय एप्लिकेशन बनवण्यासाठी काम करेल. ज्यात स्थानिक भाषेत हवामानाची माहिती, पीकांचा भाव देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत संवादही असेल. त्याचसोबत AI मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रातही समस्येवर निरसन करेल. इमेजिंग स्कॅनच्या माध्यमातून ज्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही तिथे मदत करेल. चक्रीवादळ, भूकंप यासारख्या आपत्कालनी परिस्थितीबाबत हे भविष्यवाणी करू शकते असंही अमेरिकन फर्मने दावा केला आहे.

मुकेश अंबानींनी शेअर केला आनंद

रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हटलं होतं की, जियो प्लॅटफॉर्म्स वेगवेगळ्या क्षेत्रात भारत केंद्रीत एआय मॉडेल आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रयोगाचं नेतृत्व करण्याची इच्छा ठेवते. आता एनवीडियासोबत डीवर मी अत्यंत खूश असून एकत्र मिळून ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करू असा विश्वास व्यक्त केला आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, जियो आणि एनवीडिया हे दोघे मिळून एआय क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करतील. ज्यात सुरक्षा, ताकद संबधित आहे. आमचे लक्ष्य देशातील संशोधक, स्टार्टअप आणि वेंचरसाठी एआय सुलभ बनवणे आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर हाऊस बनवण्याच्या दिशेने भारताची प्रगती आणखी वेगाने हाईल असं त्यांनी म्हटलं.

Web Title: Mukesh Ambani's entry into the AI industry; A big deal was made with an American company Nvidia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.