Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची घट 

मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची घट 

Mukesh Ambani : मुंबई भांडवली बाजाराच्या व्यवहारांना सोमवारी सुरुवात होताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये ७ टक्क्यांनी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 02:07 AM2020-11-03T02:07:21+5:302020-11-03T06:39:50+5:30

Mukesh Ambani : मुंबई भांडवली बाजाराच्या व्यवहारांना सोमवारी सुरुवात होताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये ७ टक्क्यांनी घसरण झाली.

Mukesh Ambani's fortune drops by 7 billion | मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची घट 

मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची घट 

मुंबई : तिमाही नफ्यात झालेल्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी सोमवारी भांडवली बाजारात जोरदार आपटी खाल्ली. परिणामी रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ७ अब्ज डॉलरची घट झाली. 
मुंबई भांडवली बाजाराच्या व्यवहारांना सोमवारी सुरुवात होताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये ७ टक्क्यांनी घसरण झाली. कोरोना महासाथीमुळे जगभरातच खनिज तेलाची मागणी मंदावली आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात १५ टक्क्यांनी तर महसुलात २४ टक्के घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सरलेल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कच्च्या तेलाच्या किमतीत ५.७ डॉलर प्रतिपिंप एवढी घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही किंमत ९.४ डॉलर प्रतिपिंप एवढी होती. घसरलेले नफ्याचे प्रमाण आणि महसुलातील घट यांचा  एकत्रित परिणाम रिलायन्सच्या समभागांवर झाल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: Mukesh Ambani's fortune drops by 7 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.