Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींच्या एका डीलने रॉकेट बनला शेअर, महिनाभरात दिला 312% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

मुकेश अंबानींच्या एका डीलने रॉकेट बनला शेअर, महिनाभरात दिला 312% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचा शेअर महिन्याभरातच 96 रुपयांवरून बीएसईवर 395.35 रुपये प्रति शेअरच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 01:52 PM2023-02-03T13:52:18+5:302023-02-03T13:53:11+5:30

कंपनीचा शेअर महिन्याभरातच 96 रुपयांवरून बीएसईवर 395.35 रुपये प्रति शेअरच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.

Mukesh Ambani's One Deal Share become rockets, lotus chocolate company share delivered 312 percent return | मुकेश अंबानींच्या एका डीलने रॉकेट बनला शेअर, महिनाभरात दिला 312% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

मुकेश अंबानींच्या एका डीलने रॉकेट बनला शेअर, महिनाभरात दिला 312% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात एकीकडे अदानी समूहाचे शेअर्स आपटत आहेत. तर दुसरीकडे एक शेअर असाही आहे, ज्याने मुकेश आंबानींसोबत झालेल्या एका डीलनंतर रॉकेट स्पीड घेतला आहे. हा शेअर सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून हा शेअर सातत्याने अपर सर्किटवर जात आहे. हा शेअर लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा (Lotus Chocolate Company Limited) आहे. या शेअरने आज शुक्रवारी 5% च्या अपर सर्किटसह 395.35 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.

96 रुपयांवरून थेट 395.35 रुपयांवर पोहोचला भाव - 
कंपनीचा शेअर महिन्याभरातच 96 रुपयांवरून बीएसईवर 395.35 रुपये प्रति शेअरच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. लोटस चॉकलेटच्या शेअर्सनी केवळ एका महिन्यांतच जवळपास 312% चा मल्टीबॅगर रिटर्न (Stock Return) दिला आहे. या प्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला आतापर्यंत 4.11 लाख रुपयांचा फायदा झाला असता.

असं आहे तेजीचं कारण - 
कंपनीच्या शेअरमधील तेजीचे कारण मुकेश अंबानीसोबत झालेली एक डील आहे. खरे तर, अंबानींनी लोटस चॉकलेट कंपनी विकत घेतली आहे. यासंदर्भात नुकतीच घोषणा करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, रिलायन्स ग्रुपची कंपनी रिलायन्स कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) आणि रिलायन्स रिटेल लिमिटेडने लोटस चॉकलेटमध्ये 26 टक्क्यांची अतिरिक्त हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात ओपन ऑफरची घोषणा केली आहे. ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 रोजी खुली होईल आणि 6 मार्च 2023 रोजी क्लोज होईल. कंपनीकडून ओपन ऑफरची फिक्सड प्राइस 115.50 रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Mukesh Ambani's One Deal Share become rockets, lotus chocolate company share delivered 312 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.