Join us

मुकेश अंबानींच्या मिळकतीत दररोज ३०० कोटींची वाढ, ३.७१ लाख कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 6:17 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मिळकतीत वर्षभरात दररोज ३०० कोटी रुपयांची वाढ झाली. बार्कलेस हुरुन इंडियाने मंगळवारी भारतीय श्रीमंताची यादी जाहीर केली.

मुंबई   - रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मिळकतीत वर्षभरात दररोज ३०० कोटी रुपयांची वाढ झाली. बार्कलेस हुरुन इंडियाने मंगळवारी भारतीय श्रीमंताची यादी जाहीर केली. त्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत वर्षभरात ४५ टक्के वाढ झाली.अहवालानुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ३ लाख ७१ हजार कोटी असून, श्रीमंतांच्या या यादीत ते सलग सातव्या वर्षी अग्रस्थानी आहेत. त्यांची संपत्ती दुसऱ्या, तिसºया व चौथ्या क्रमांकावरील श्रीमंतांच्या एकूण संपत्तीहूनही अधिक आहे. एस पी हिंदुजा (१ लाख ५९ हजार कोटी), लक्ष्मीनारायण मित्तल (१ लाख १४ हजार ५०० कोटी) व अझिम प्रेमजी (९६ हजार १०० कोटी) हे अनुक्रमे दुसºया, तिसºया व चौथ्या स्थानी आहेत.सन फार्मा कंपनीचे दिलीप संघवी यांची संपत्ती ८९ हजार ७०० कोटी असून, ते पाचव्या स्थानी आहेत. त्यानंतर, उदय कोटक (७८ हजार ६०० कोटी), सायरस पुनावाला (७३ हजार कोटी), गौतम अदानी (७१ हजार २०० कोटी) व सायरस पालनजी(६९ हजार ४०० कोटी) यांचा यादीत समावेश आहे.अहवालात श्रीमंत कुटुंबांची यादीही जाहीर केली. त्यातहीअंबानी कुटुंबीय अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ गोदरेज, हिंदुजा, मिस्त्री, शांघवी, नादर, अदानी, दमानी, लोहिया व बर्मन या कुटुंबांचा क्रमांक आहे.पुढील १० वर्षांत कारभार युवा पिढीच्या हातीपुढील दहा वर्षांत या व्यवसायिक कुटुंबांचा कारभार युवा पिढीच्या हातात असेल, असेही यात म्हटले आहे. उद्योगाच्या निमित्ताने विदेशात गेलेल्या ६६ श्रीमंत अनिवासी भारतीयांपैकी २१ यूएईतील आहेत. एसपी हिंदुजा व कुटुंबीय हे १ लाख ५९ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत अग्रस्थानी आहेत.८३१ भारतीयांकडे १००० कोटीहून अधिक संपत्ती१००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांचा आकडा मागीलवर्षी ६१७ होता. तो आता ८३१ वर गेला आहे. या सर्व ८३१ श्रीमतांकडील एकूण संपत्ती ७१ हजार ९०० कोटी डॉलर्स आहे.हा आकडा २ लाख ८४ हजार ८०० कोटी डॉलर्सच्या भारताच्या जीडीपीच्या ३३ टक्के आहे. या यादीत सर्वाधिक २३३ श्रीमंत आर्थिक राजधानी मुंबईतील आहेत. त्यापाठोपाठ १६३ राजधानी दिल्ली व ७० श्रीमंत हे आयटीची राजधानी बेंगळुरूतील आहेत. १००० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या या यादीत ३०६ नवीन श्रीमंतांचा समावेश झाला आगे, तर ७५ श्रीमंत या यादीतून बाहेर गेले आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स