Lokmat Money > बिझनेस न्यूज > रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...

रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...

भारतातील दोन आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फायदा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:04 PM2022-05-20T17:04:05+5:302022-05-20T17:05:14+5:30

भारतातील दोन आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फायदा झाला आहे.

mukesh anbani gautam adani getting richer by russia ukraine war commodities prices rising | रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...

रशिया-युक्रेन युद्धामुळे अदानी-अंबानींची होतेय बक्कळ कमाई!, कशी? जाणून घ्या...

नवी दिल्ली-

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या युद्धानं केवळ प्रचंड विध्वंस आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी केली नाही तर जागतिक विकासालाही (Global Growth)  धोका निर्माण झाला आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीचा फायदाही अनेकांना होत आहे. यात भारतातील दोन आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा समावेश आहे. पूर्व युरोपात सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ होत आहे. 

दोन्ही उद्योगपतींनी हरित ऊर्जेवर मोठी गुंतवणूक केलेली असली तरी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दोघेही पारंपारिक इंधनाचा पुरेपूर वापर करत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यामध्ये गव्हासारख्या धान्यापासून ते कच्चं तेल आणि कोळसा यांचा समावेश होतो. कोळशाच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींचा फायदा घेण्यासाठी, गौतम अदानी वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील वादग्रस्त खाणीची क्षमता वाढवत आहेत.

दुसरीकडे, जर आपण मुकेश अंबानीकडे पाहिले तर त्यांची कंपनी कच्च्या तेलातून नफा कमवत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कच्च्या तेलाचा अडकलेला माल सवलतीत खरेदी करत आहे आणि त्यांचा रिफायनरीमध्ये वापर करत आहे. जामनगर येथील कंपनीची रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. बदललेल्या परिस्थितीत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी रिलायन्सने या रिफायनरीची देखभालही पुढे ढकलली आहे. यासह, अंबानींची कंपनी 3 वर्षांत डिझेल आणि पेट्रोलवर सर्वाधिक मार्जिनचा पुरेपूर फायदा घेत आहे.

हरित ऊर्जेवर किती गुंतवणूक?
अदानी आणि अंबानी यांनी अलीकडेच ग्रीन एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. पुढील काही दशकांमध्ये दोघे मिळून हरित ऊर्जा क्षेत्रात 142 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीची घोषणा करताना दोन्ही उद्योगपतींनी हरित ऊर्जा कोळसा आणि कच्च्या तेलाला पर्यायी ठरेल, असं सांगितलं होतं. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळसा आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही उद्योगपती घेत आहेत.

मार्च महिन्यात दोन्ही कंपन्यांना जबरदस्त फायदा
बदललेल्या परिस्थितीचा फायदा दोन्ही उद्योगपतींना कसा होतोय, हेही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. कोळशाच्या वाढत्या किमतींमुळे मार्च तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या नफ्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यातील कंपनीचा हा सर्वाधिक नफा देखील होता. त्याचप्रमाणे, वाढत्या पेट्रोलियमच्या किमतींमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला मार्च तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक नफा नोंदवण्यात मदत झाली.

अदानी-अंबांनीची संपत्ती किती वाढली?
रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून एप्रिल अखेरपर्यंत अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या किमतीत ४२ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमती १९ टक्क्यांनी वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून अदानीची संपत्ती (Gautam Adani Net Worth) सुमारे २५ अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याचप्रमाणे, अंबानींची (Mukesh Ambani Networth)  एकूण संपत्ती सुमारे ६ अब्ज डॉलरने वाढली आहे.

Web Title: mukesh anbani gautam adani getting richer by russia ukraine war commodities prices rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.