Multibagger IPO: २०२१ या वर्षात ना केवळ शेअर्सनं उत्तम रिटर्न दिलंय, तर दुसरीकडे आयपीओमधूनही चांगली कमाई झाली आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा आयपीओ (EKI Energy IPO) असा एक पब्लिक इश्यू आहे जो एप्रिल २०२१ मध्ये लिस्ट झाला होता. हा पब्लिक इश्यू आपल्या लिस्टिंग डे वर ३७ टक्के अधिक प्रीमिअमनं १४० रुपयाच्या स्तरावर खुला झाला. या आयपीओचा प्राईस बँड १०० ते १०२ रुपये इतका होता. ईएकेआय एनर्जीच्या शेअरची किंमत आज ७,६२५.२० रुपये आहे. जे त्याच्या प्रति इक्विटी शेअरच्या वरच्या मूल्याच्या बँडपेक्षा ७३७५ टक्के अधिक आहे.
गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अधिक विक्री होत असल्याचं दिसून येत आहे आणि या कालावधीत तो जवळपास १६ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ६ महिन्यांत, हा शेअर १९०० रुपयांवरून ७६२५ रुपयांच्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत स्टॉकची किंमत सुमारे ३०० टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष-दर-वर्षानुसार (YTD) पाहिल्यास या मल्टिबॅगर शेअरची किंमत सुमारे २६ टक्क्यांनी घसरली आहे. परंतु गेल्या १९९ महिन्यात हा शेअर १४० रुपयांवरून ७६२५ रुपयांच्या स्तरावर पोहोचलाय. म्हणजेच बाजारात लिस्ट झाल्यापासून कंपनीचा शेअर ४४५० टक्क्यांनी वाढलाय.
गुंतवणूकदारांना मोठा फायदाजर आपण याच्या इश्यू प्राईजची तुलना शेअरच्या सध्याच्या किंमतीबरोबर केली, तर हा आयपीओ १०० ते १०२ रुपये प्रति शेअर इश्यू प्राईजवर होता. याचाच अर्थ हा शेअर आज १०२ रुपयांवरून ७६२५ रुपयांवर पोहोचलाय. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ७३७५ टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.
EKI Energy Services Limited IPO प्रति इक्विटी शेअर १०० रुपये ते १०२ रुपये या दराने ऑफर करण्यात आला होता. या इश्यूसाठी १२०० शेअर्स लॉटमध्ये होते. याचाच अर्थ या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी १,२२,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. जर आतापर्यंत कोणत्याही गुंतवणूकदारानं आपली रक्कम तशीच ठेवली असती, तर आज त्याच्या रकमेचं मूल्य ९१.५० लाख रूपये झालं असतं.