Join us  

Multibagger Penny Stock : 1 आणि 2 रुपयांच्या 'या' शेअर्सची कमाल; 1 लाखाचे केले 6 कोटी! दिला 61775 टक्के बम्पर परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 9:22 PM

शेअर बाजारात काही शेअर्स असे आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये बम्पर परतावा देऊन गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे.

शेअर बाजारात काही शेअर्स असे आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये बम्पर परतावा देऊन गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. आज आम्‍ही आपल्याला अशाच दोन शेअर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. ज्यांनी 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे. यांपैकी एक आहे, यूपीएल लिमिटेड (UPL Ltd) आणि दुसरा आहे. ल्यूपिन लिमिटेड (Lupin Limited). यूपीएल लिमिटेड आणि ल्यूपिन लिमिटेड या दोन शेअर्समध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तो आतापर्यंत कोट्यधीश झाला असता. 

शेअर प्राइस हिस्ट्री -यूपीएल लिमिटेडचा शेअर 5 जुलै 2002 रोजी 1.20 रुपयांना होता तो 5 ऑगस्ट 2022 रोजी 742.50 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात गेल्या 20 वर्षांत या शेअरने 61,775.00 टक्के एवढा परतावा दिला आहे. तसेच, ल्यूपिन लिमिटेडचा शेअर 8 जानेवारी 1999 रोजी 2.33 रुपयांना होता तो आता वाढून 5 ऑगस्त 2022 ला 669.40 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात गेल्या 23 वर्षांत या शेअरने 28,629.61 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.

गेल्या 20 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने यूपीएल लिमिटेडच्या शेअरमध्ये 1.20 रुपयांनुसार, 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 6 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले असते. तसेच, 23 वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने ल्यूपिन लिमिटेडच्या शेअर्समध्ये 2.33 रुपयांनुसार, 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 2.87 कोटी रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक