Lokmat Money > बिझनेस न्यूज > या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिले 42 हजार टक्के रिटर्न्स...

या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिले 42 हजार टक्के रिटर्न्स...

Multibagger Penny Stocks: शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 08:23 PM2023-09-04T20:23:51+5:302023-09-04T20:24:01+5:30

Multibagger Penny Stocks: शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Multibagger Penny Stocks: These multibagger stocks have given bumper returns of 42 thousand percent | या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिले 42 हजार टक्के रिटर्न्स...

या मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिले 42 हजार टक्के रिटर्न्स...

Multibagger Penny Stocks: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची आहे, कधी मोठा फायदा होतो तर कधी नुकसानही सहन करावे लागते. शेअर बाजाराची माहिती असेल आणि विचारपूर्वक गुंतवणूक केली, तर एखादा लहान शेअरदेखील मोठी कमाई करुन देतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 11 शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. हे शेअर्स आजही तेजीत आहेत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 42 हजार टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. 

गुंतवणूकदारांना करोडपती बनवले
गुंतवणूकदारांना बंपर परतावा देणारा पहिला स्टॉक द्वारकेश आहे. याने गुंतवणूकदारांना 42 हजार टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना हा परतावा मिळाला आहे. याशिवाय UNOMINDA शेअर्सनेही 10 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 33519.15 टक्के परतावा दिला आहे. तर DSSL शेअर्सने याच कालावधीत गुंतवणूकदारांना 26149.56 टक्के परतावा दिला आहे. JBMA_T शेअर्सनी 25422.6 टक्के, तर KEI च्या शेअर्सने 24035.38 टक्के परतावा दिला आहे.

शेअर बाजारातील TANLA स्टॉकनेही 10 वर्षात गुंतवणूकदारांना तब्बल 22855.29 टक्के परतावा दिला, तर REFEX ने 15240.34 टक्के परतावा दिला आहे. APLAPOLLO शेअर्सने गुंतवणूकदारांना 12436.15 टक्के परतावा दिला, तर OLECTRA ने 10 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 12375.79 टक्के परतावा दिला आहे. TIPSINDLTD ने 10737.62 आणि NAVINFLUOR 10184.98 टक्के परतावा दिला आहे.

(टीप- आम्ही फक्त शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देत आहोत, गूंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Web Title: Multibagger Penny Stocks: These multibagger stocks have given bumper returns of 42 thousand percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.