Multibagger Share : शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दमदार शेअर असणे गरजचे आहे. मात्र, अनेकजण स्वतः स्टॉक्सची निवड करण्याऐवजी मार्केट एक्सपर्टचा सल्ला ऐकतात. दरम्यान, शेअर बाजार तज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी एक दमदार स्टॉकची निवड केली आहे. या शेअरमध्ये पैसे पैसे गुंतवून तुम्ही चांगले प्रॉफिट मिळवू शकता. खासकरुन रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो.
कोणता आहे हा स्टॉक?
शेअर बाजार तज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी नाईल लिमिटेडची ( Nile Ltd.) निवड केली आहे. ही कंपनी 1987 पासून कार्यरत असून, लीड रिसायकलिंग कपचे उत्पादन कते. त्यांनी पहिल्यांदाच हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी 600-700 कोटी रुपयांची आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर समाविष्ट करू शकतात.
कंपनीचे फन्डामेन्टल्स कसे आहेत?
कंपनीचे क्रेडिट रेटिंग उत्कृष्ट आहे. कंपनीचे प्रमोटर्स अनुभवी आहेत. गेल्या 3 वर्षात सेल्स ग्रोथ वाढ 16-17 टक्के आणि नफ्यात 31 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीतील प्रमोटर्सचे भागभांडवल मोठे आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकची किंमत खाली येण्याची वाट पहा आणि नंतर खरेदी करा.
(टीप: शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे, ही लोकमतची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)