Join us  

Multibagger Stock: गुंतवणुकदार मालामाल! 2 रुपयांचा स्टॉक 1700वर, 1 लाखाचे झाले 8 कोटी; तुमच्याकडे आहे का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 5:33 PM

Multibagger Stock: जिथे अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आपटताना दिसत आहेत, तिथे काही कंपन्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.

Multibagger Stock: सध्या शेअर बाजारात मंदीचे सावट आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स धडाधड आपटताना दिसत आहेत. पण या वातावरणातही काही शेअर्स जबरदस्त परतावा देत आहेत. असाच एक स्टॉक प्लास्टिक उत्पादने बनवणाऱ्या अॅस्ट्रल लिमिटेड कंपनीचा आहे. या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने काही वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

या कंपनीचे शेअर्स अवघ्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीने त्यांच्या शेअर होल्डर्सना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,524.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,609.75 रुपये आहे.

1 लाखाचे झाले 8.8 कोटी 13 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Astral Limited चे शेअर्स रु. 1.98 च्या पातळीवर होते, तर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 3 जून 2022 रोजी NSE वर कंपनीचे शेअर्स रु. 1746 वर बंद झाले. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सने 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 8.81 कोटी रुपये झाले असते.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकशेअर बाजार