Join us  

Multibagger Stock: सर्वात मोठ्या खासगी बँकेने गुंतवणुकदारांना केले मालामामल; 36 हजाराचे झाले 1 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 7:23 PM

Share Market Investment: भारतातील एका खासगी बँकेने गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

Share Price: सध्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड आपटत आहेत. पण, असे असतानाही देशातील एका खासगी बँकेने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC) बँकेचे शेअर्सने गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

गेल्या 22 वर्षांत एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली आहे. त्यामुळेच, लोकांचा HDFC बँकेवर खूप विश्वास आहे. एचडीएफसी बँकेचे स्टॉक नेहमीच वरच्या दिशेने गेलेले दिसतात. विशेष म्हणजे, 1 जानेवारी 1999 रोजी एचडीएफसी बँकेच्या शेअरची किंमत फक्त 5.52 पैसे होती. पण, आता हा शेअर 1300 रुपयांच्या वर गेला आहे. एकेकाळी हा 1700 रुपयांवर गेला होता.

म्हणजेच, 1999 मध्ये जर एखाद्याने या स्टॉकमध्ये 36000 रुपये गुंतवले असतील तर आजच्या काळात त्याला करोडो रुपयांचा फायदा झाला असता.  गुंतवणूकदाराने गुंतवलेले 36,000 रुपये 22 वर्षांत 1,03,50,000 रुपये झाले असते. म्हणजेच एचडीएफसीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

टॅग्स :एचडीएफसीव्यवसायगुंतवणूकशेअर बाजार