Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल

अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात अनेक स्मॉलकॅप मल्टीबॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 05:37 PM2024-02-04T17:37:54+5:302024-02-04T17:38:36+5:30

शेअर बाजारात अनेक स्मॉलकॅप मल्टीबॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

Multibagger Stock: Just Rs 3 share, 16000% return; 10 thousand became 16 lakhs | अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल

अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात बराच चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही अशाच एका स्मॉलकॅप मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. फक्त 10 हजार रुपये गुंतवणाऱ्यांना या शेअरने तब्बल 16 लाख रुपये दिले.

या स्मॉलकॅप शेअरचे नाव रेफेक्स इंडस्ट्रीज लिट(Refex Industries Ltd) आहे. या शेअरने गेल्या 10 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. स्टॉकमध्ये 16,000% वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक कायम राहिली तर आता त्या व्यक्तीकडे जवळपास 16 लाख रुपये जमा झाले असतील. 

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या शेअरची कामगिरी मंदावली आहे. गेल्या एका महिन्यात रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11.04 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 3 महिन्यांत सुमारे 29% वाढ झाली आहे.

कंपनीचे काय काम?
रेफेक्स इंडस्ट्रीज भारतात रेफ्रिजरंट गॅसेस बनवते आणि रि-फिलिंगचे काम करते. एक्सचेंजेसकडे उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीत 53.27% हिस्सा आहे. तर, सार्वजनिक भागधारकांकडे उर्वरित 46.73% हिस्सा आहे. याशिवाय सार्वजनिक भागधारक, म्युच्युअल फंड आणि परदेशी गुंतवणूकदार यांचा कोणताही भागभांडवल नाही. किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीमध्ये 29% हिस्सा आहे.

कंपनीच्या ऑपरेशन रेव्हेन्यूमध्ये घट 
जर आपण कंपनीच्या तिमाही निकालांबद्दल बोललो तर, कंपनीच्या ऑपरेशन रेव्हेन्यूमध्ये तिमाही-दर-तिमाही 8% ने घट होऊन ती 352 कोटी रुपये झाली आहे. तर, करानंतरचा नफा 21.43 कोटी रुपये होता.

(टीप: येथे फक्त शेअर्सच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger Stock: Just Rs 3 share, 16000% return; 10 thousand became 16 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.