Join us

गुंतवणूकदार मालामाल; ₹38 चा शेअर ₹800 वर पोहोचला; पाच वर्षांत 21 पटीने पैसे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 4:49 PM

या मल्टिबॅगर शेअरने फक्त पाच वर्षात 1 लाखाचे 21 लाख केले.

Multibagger Metal Stock : शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, परंतु कधी-कधी असा एखादा शेअर हाती लागतो, जो अल्पावधीत गुंतवणूकदारांना बंपर नफा (Multibagger Stock) मिळवून देतो. या मल्टिबॅगर शेअर्समध्ये जिंदाल स्टेनलेसचा (Jindal Stainless) स्टॉकदेखील आहे. या शेअरने फक्त 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

1 लाखाचे झाले 21 लाखअवघ्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक बनलेल्या जिंदाल स्टेनलेसचे शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजे आज(दि.27) सुमारे 2 टक्के वाढीसह 797 रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षात या शेअरने 2100+ टक्के परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजी जिंदाल स्टेनलेस लिमिटेडच्या एका शेअरची किंमत फक्त 38 रुपये होती, जी आता 797 रुपयांवर पोहोचली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या मेटल शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत ठेवले असेल, तर त्याची रक्कम आता 21,57,000 रुपये झाली असेल.

दोन वर्षांत शेअर रॉकेट वेगाने वाढलेजिंदाल स्टेनलेस शेअरच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवर नजर टाकली, तर 2019 ते 2021 या काळात हा शेअर अतिशय संथ गतीने वाढला. पण, 2022 मध्ये त्यात थोडीशी वाढ झाली आणि 30 सप्टेंबरला 2022 रोजी त्याची किंमत रु. 125 वर पोहोचली. 2023 च्या सुरुवातीला जिंदाल स्टेनलेसच्या शेअर्सनी वेग पकडला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. जर आपण या वर्षाबद्दल बोललो, तर हा शेअर 848 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

केवळ एका वर्षात शेअर्सची किंमत 70% वाढलीगेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे, तर एका वर्षात हा शेअर 70 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, गेल्या पाच दिवसांपासून शेअरच्या वाढीचा ट्रेंड सुरू आहे. शेअर्समधील या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवलही वाढले असून ते 65170 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक