Join us

Multibagger Stock : १६.९५ रूपयांचा शेअर पोहोचला २०३० रूपयांवर, गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे झाले १.१९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 5:25 PM

Multibagger Stock: सध्या या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसत असली तरी या शेअरनं दीर्घ कालावधीसाठी जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि महासाथ असतानाही, भारतीय शेअर बाजाराने अलीकडच्या वर्षांत मोठ्या प्रमाणात मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत. दीपक नायट्रेट लिमिटेडच्या (Deepak Nitrite Ltd share price) शेअर हा असाच प्रकारचा एक स्टॉक आहे. हा मल्टीबॅगर केमिकल स्टॉकमध्ये (Multibagger chemical stock) गेल्या वर्षभरात अधिक विक्री दिसत असली तरी त्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Stock return) देऊन आश्चर्यचकित केले आहे.

दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत NSE वर गेल्या 10 वर्षांत ₹16.95 वरून ₹2,030 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना 11,875 टक्के परतावा दिला आहे. दीपक नाइट्राइटच्या शेअरची किंमत गेल्या 5 वर्षांत जवळपास ₹145 वरून ₹2,030 पर्यंत वाढली आहे. या कालावधीत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1,280 टक्के परतावा दिला आहे. असं असलं तर वर्षभराच्या कलावधीत या शेअरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर केवळ 2022 या वर्षामध्ये हा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी घसरला आहे.

दीपक नायट्रेटच्या शेअरच्या प्राईज हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने या टॉकमध्ये 2022 च्या सुरुवातीला ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्या 1 लाख मूल्य 80,000 झाले असते. तर गेल्या वर्षात हे मूल्य 95,000 रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखांचे मूल्य आज 13.80 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, ज्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले होते, त्याच्या 1 लाखांचे मूल्य 1.19 कोटी रुपये झाले असते.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक