Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या ₹1 रुपयाच्या शेअरने केले मालामाल; ₹ 1 लाख गुंतवणारे झाले ₹ 2 कोटींचे मालक...

अवघ्या ₹1 रुपयाच्या शेअरने केले मालामाल; ₹ 1 लाख गुंतवणारे झाले ₹ 2 कोटींचे मालक...

या स्टॉकने गुंतवणूकदारांना तब्बल 28000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:19 PM2024-07-30T18:19:37+5:302024-07-30T18:20:35+5:30

या स्टॉकने गुंतवणूकदारांना तब्बल 28000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

Multibagger Stock: share of just ₹1 made huge profit; ₹ 1 lakh investor becomes owner of ₹ 2 crore | अवघ्या ₹1 रुपयाच्या शेअरने केले मालामाल; ₹ 1 लाख गुंतवणारे झाले ₹ 2 कोटींचे मालक...

अवघ्या ₹1 रुपयाच्या शेअरने केले मालामाल; ₹ 1 लाख गुंतवणारे झाले ₹ 2 कोटींचे मालक...

Multibagger Stock :शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. पण, मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. काहींनी दीर्घ मुदतीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा दिला आहे, तर काही शेअर्स अल्पावधीत मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षांत करोडपती बनवले. 

1 रुपयाचा शेअर 419 वर पोहोचला
आम्ही ज्या स्टॉकबद्दल बोलत आहोत, तो पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचा आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयांवरुन 408 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी 2 ऑगस्ट 2019 रोजी या स्टॉकची किंमत फक्त 1.45 रुपये होती. आज(दि.30) देखील कंपनीचे शेअर्स जोरदार वाढीसह उघडले आणि काही मिनिटांतच सुमारे 3 टक्क्यांच्या उसळीसह 419.30 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. 

5 वर्षात 28,210% परतावा 
सरकारने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांवर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे, ज्याचा परिणाम या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवरही दिसून येतोय. या क्षेत्रातील वाढीमुळे शेअर्समध्येही मोठी वाढ होत आहे. हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 28,244 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 ऑगस्ट 2019 रोजी 1.45 रुपयांना शेअर्स खरेदी करुन त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आतापर्यंत ठेवले असते, तर त्याची रक्कम 2.82 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. 

स्टॉकची ही कामगिरी होती
रिअल इस्टेट कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडचे ​​मार्केट कॅप 777.09 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पेनी स्टॉक केवळ पाच वर्षांतच नव्हे तर एका वर्षाच्या कालावधीतही मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशात 246 टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ, ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले, त्यांची रक्कम 12 महिन्यांत 3 लाख रुपयांवर पोहचली असेल. गेल्या आठवड्यापासून या स्टॉकमध्ये पुन्हा मोठी वाढ होत आहे आणि अवघ्या 5 दिवसात तो 12% वर गेला आहे.

(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नसून, फक्त माहिती आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी.)
 

 

Web Title: Multibagger Stock: share of just ₹1 made huge profit; ₹ 1 lakh investor becomes owner of ₹ 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.