Join us  

Multibagger Stocks : १० रुपयांच्या शेअरनं दिले ४७,१५० टक्क्यांचे रिटर्न, १ लाखांचे झाले ९.४४ कोटी; विजय केडियांचीही गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 3:17 PM

Vijay Kedia portfolio stock:  या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल. आतापर्यंत ४७,१५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विजय केडियांचीही आहे गुंतवणूक.

Vijay Kedia portfolio stock: अनेकदा शेअर बाजारात पैसे गुंतवून लगेच काढण्यात नाही, तर पैसे काही काळासाठी गुंतवून ठेवून देण्यास अधिक फायदा आहे. जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकते. सेरा सॅनेटरीवेअरच्या (Cera Sanitaryware share price) शेअर्सनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. विजय केडिया यांचीदेखील यात गुंतवणूक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये बीएसईवर या शेअरची किंमत 10 रूपयांवरून वाढून 4725 रूपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत 47,150 टक्क्यांची वाढ झाली आहे.

विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या शेअरमध्ये गेल्या एक वर्षापासून विक्रीचा दबाव आहे. गेल्या एका वर्षात त्या शेअरने आपल्या भागधारकांना फक्त 2 टक्क्यांचा परतावा दिला आहे, तर गेल्या 5 वर्षात हा शेअर जवळपास ₹ 2,735 वरून ₹ 4,725 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 75 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या 10 वर्षांत बीएसईवर या शेअरची किंमत जवळपास ₹300 वरून ₹4,725 पर्यंत वाढले आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये शेअरधारकांना सुमारे 1,475 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 15 वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे ₹70 वरून ₹4,725 पर्यंत वाढला आहे, गेल्या दीड दशकात जवळपास यामध्ये 6,650 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे, हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या दोन दशकांत म्हणजे 20 वर्षांत ₹10 वरून ₹4,725 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्याने ₹47,150 टक्के परतावा दिला आहे.

किती दिला परतावा?जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखांचे मूल्य आज 1.75 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 15.75 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्या 1 लाखांचे मूल्य 1.34 कोटी रुपये झाले असते. तथापि, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखांचे मूल्य आज 9.44 कोटी झाले असते.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय