Multibagger Stocks : दीपक नायट्रेटच्या (Deepak Nitrite) शेअर्सनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी उत्तम राहिली आहे की, 1 लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार काही वर्षांत कोट्यधीश झाले आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनं गेल्या 10 वर्षांत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 13,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दीपक नायट्रेटचे मार्केट कॅप 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
23 मार्च 2012 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) दीपक नाइट्राइटचे शेअर्स 14.70 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स NSE वर 2,142.50 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीच्या समभागांनी 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 13,780 टक्के रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 23 मार्च 2012 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या त्याची किंमत 1.37 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीला थेट 1.36 कोटी रुपयांचा फायदा झाला असता.
5 वर्षांत 1 लाखांचे 19.5 लाख
17 फेब्रुवारी 2017 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर दीपक नायट्रेटचे शेअर्स 103.65 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,142.50 रुपयांच्या पातळीवर आहेत. दीपक नायट्रेटच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षात जवळपास 1,850 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्या पैशांचे मूल्य 19.55 लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,020 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची निम्न पातळी 1,131 रुपये आहे.