नवी दिल्ली : भारतातील खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेली ॲक्सिस बँक बहुराष्ट्रीय सिटी बँकेचा भारतातील रिटेल बँकिंग व्यवसाय खरेदी केला आहे. यासंबंधीच्या व्यवहाराची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. हा सौदा २.५ अब्ज डॉलरचा म्हणजेच सुमारे १८ हजार कोटी रुपयांचा आहे. त्याला नियामकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे. अमेरिकेच्या बँकिंग व्यवसायातील प्रमुख नाव असलेला सिटीसमूह भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडू इच्छितो.
हा समूहाच्या जागतिक रणनीतीचा भाग असून एप्रिल २०२१ मध्येच समूहाने या धोरणाची घोषणा केली होती. भारतातील व्यवसाय विकणार असल्याचे सूतोवाचही कंपनीने केले होते. सिटी बँकेच्या भारतात ३५ शाखा असून ४ हजार कर्मचारी आहेत.या साैद्यास मान्यता मिळाल्यानंतर ॲक्सिस बँकेचा ताळेबंद विस्तारित होईल.