Lokmat Money > बिझनेस न्यूज > बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार

बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार

भारताचे वाढते वजन, गतिमान आर्थिक विकास, एआय एक्सलन्स सेंटर आदींमुळे या कंपन्या भारतात येण्यास इच्छूक आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:35 AM2024-09-13T06:35:45+5:302024-09-13T06:36:20+5:30

भारताचे वाढते वजन, गतिमान आर्थिक विकास, एआय एक्सलन्स सेंटर आदींमुळे या कंपन्या भारतात येण्यास इच्छूक आहेत. 

Multinational companies will provide huge number of employees in India; 70 percent of the top 500 companies will come | बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार

बहुराष्ट्रीय कंपन्या देणार भारतात भरमसाट नाेकऱ्या; टाॅप ५०० पैकी ७० टक्के कंपन्या येणार

नवी दिल्ली - भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ग्लाेबल कॅपेबिलिटी सेंटर्सने (जीसीसी) गेल्या पाच वर्षांमध्ये झपाट्याने विस्तार केला आहे.

वर्ष २०३०पर्यंत फाॅर्च्यून ५०० कंपन्या म्हणजेच जगभरातील टाॅप ५०० कंपन्यांपैकी ७० टक्के कंपन्या भारतात विस्तार करतील. नॅसकाॅम आणि जिनाेव्ह यांनी जारी केलेल्या ‘इंडिया जीसीसी लॅण्डस्केप रिपाेर्ट’ अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. भारताचे वाढते वजन, गतिमान आर्थिक विकास, एआय एक्सलन्स सेंटर आदींमुळे या कंपन्या भारतात येण्यास इच्छूक आहेत. 

राेजगार वाढणार

‘जीसीसी’चा विस्तार पुढील काही वर्षांमध्ये देशात माेठी राेजगारनिर्मिती करणार आहे.
‘जीसीसी’मध्ये सध्या १९ लाख कर्मचारी संख्या आहे.
२५-२८ लाखांपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या पाेहाेचू शकते.

वेतनही भरघाेस

९ लाख ते ४३ लाख रुपये एवढे वार्षिक वेतन ‘जीसीसी’मध्ये साॅफ्टवेअर डेव्हलपर्सना मिळत आहे. त्यातुलनेत आयटी कंपन्यांमध्ये ६ ते १८ लाख रुपये वार्षिक वेतन मिळत आहे, असे टीमलीजच्या डिजिटल स्किल्स अहवालात म्हटले आहे.

Web Title: Multinational companies will provide huge number of employees in India; 70 percent of the top 500 companies will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.