Join us

दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 9:31 AM

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मुंबई हे भारतातील सर्वाधिक महागडे शहर ठरले असून राजधानी दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नई, बंगळुरू आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागला. 

जागतिक पातळीवरील ‘मर्सर’ या संस्थेने जारी केलेल्या ‘२०२४ कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ नामक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत पर्सनल केअर, वीज, वाहतूक, घरभाडे आणि इतर आवश्यक बाबींचा खर्च खूप अधिक आहे. महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही. जागतिक पातळीवर मुंबई १३६ व्या क्रमांकाचे सर्वाधिक महागडे शहर ठरली आहे. जाहाँगकाँग हे जगातील पहिल्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.

किमती कुठे अधिक?

भारत१. मुंबई२. नवी दिल्ली३. चेन्नई४. बंगळुरू५. हैदराबाद६. पुणे७. कोलकाता

जगातहाँगकाँगसिंगापूरझुरिखजिनेव्हाबेसलबर्नन्यूयॉर्क सिटी 

टॅग्स :मुंबईदिल्लीमहागाई