मुंबई : किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय किंगफिशर हाउस बंगळुरू येथील कर्जवसुली लवादाने सहाव्यांदा लिलावासाठी उपलब्ध केले आहे. या हाउसची किंमत ८२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, पहिल्या लिलावात त्याची जी किंमत अपेक्षित होती, त्यापेक्षा आता ती ४५ टक्के कमी आहे.
लवादाने म्हटले आहे की, १३ फेब्रुवारी, २०१८ रोजी हा लिलाव ई-लिलावाद्वारे होईल. मल्ल्याकडून ६,२०३ कोटी रुपयांचे कर्ज व जून २०१३ पासून ११.५ टक्के दराने व्याज वसूल करायचे आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात करण्यात आलेल्या पाचव्या लिलावात हे हाउस खरेदीसाठी कोणीही पुढे आले नव्हते. या आधी या हाउसची किंमत ९२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.
विजय मल्ल्या यांचा गोवा येथील प्रसिद्ध किंगफिशर व्हिला अभिनेते सचिन जोशी यांना वाटाघाटीतून ७३ कोटी रुपयांत विकण्यात आला होता. या व्हिलाचे अनेक त्या आधी लिलाव अपयशी ठरले होते. अनेक लिलावांच्या माध्यमातून राखीव किमतीत कपात करून कर्ज देणारे सुरक्षित पावले टाकत आहेत. कर्ज देणाºया १७ संस्थांच्या मंडळाचे नेतृत्व स्टेट बँक आॅफ इंडिया करीत आहे.
या मंडळाने २०१६ मध्ये या हाउसची किमत १५० कोटी ठरविली होती. ती घ्यायला कोणी न
आल्यामुळे ही राखीव किंमत
आॅगस्ट २०१६ मध्ये १३५ कोटी
रुपये तर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ११५ आणि मार्च २०१७ मध्ये १०३.५ कोटी रुपये निश्चित केली गेली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात राखीव किंमत ९३.५ कोटी रुपयांत पाचवा लिलाव केला गेला होता.
किंमत अधिक की कमी?
मालमत्तांच्या व्यवहारांतील दलालांच्या म्हणण्यानुसार, हे हाउस जरी मध्यवर्ती ठिकाणी (विमानतळाजवळ) असले, तरी त्याची राखीव किंमत ही सध्या बाजारातील किमतीपेक्षा खूप जास्त आहे.
तथापि, कर्ज देणाºयांनी या हाउसची किंमत १५० कोटी रुपये निश्चित केली असली, तरी मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे हाउस विमानतळाच्या जवळ असल्यामुळे, त्याच्यासमोरच्या भागाच्या उंचीवर मर्यादा आहेत. तळघर, लोअर ग्राउंड, ग्राउंड आणि अप्पर फ्लोअर, असे हाउसचे स्वरूप आहे.
मुंबईतील किंगफिशर हाउसचा होणार पुन्हा लिलाव! हाउसची किंमत निश्चित
किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय किंगफिशर हाउस बंगळुरू येथील कर्जवसुली लवादाने सहाव्यांदा लिलावासाठी उपलब्ध केले आहे. या हाउसची किंमत ८२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, पहिल्या लिलावात त्याची जी किंमत अपेक्षित होती, त्यापेक्षा आता ती ४५ टक्के कमी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:15 AM2018-01-13T02:15:03+5:302018-01-13T05:45:54+5:30