मुंबई : देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहेत. सीबीआरई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे. देशभरातील एकूण डेटा सेंटर्समध्ये मुंबईचा वाटा २८ टक्के आहे.
घसरणारा रुपया, इंधनाचे वाढते दर, त्यात कमी झालेली मागणी यामुळे सध्या सर्वच क्षेत्रात मंदीसदृश्य वातावरण आहे. पण ई-कॉमर्स व डिजिटायझेशनमुळे किरकोळ बाजारात कार्यरत असलेल्या जवळपास प्रत्येक कंपनीला डेटा सेंटरची गरज भासते. त्यामुळेच त्यांची संख्या सातत्याने वाढती आहे. त्यामध्ये मुंबई अग्रणी आहे. सीबीआरईनुसार, देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स प्रामुख्याने मुंबई, दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद व कोलकाता या सात शहरांमध्ये आहेत. सात शहरांत मिळून १३३ डेटा सेंटर्स आहेत. त्यापैकी ३५ सेंटर्स मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ बंगळुरूमध्ये २७ व दिल्ली एनसीआरमध्ये १९ डेटा सेंटर्स आहेत. पुण्यात पाच सेंटर्स आहेत.
रोजगार निर्मितीही
अॅपआधारित व्यवसाय सर्वत्र वाढत असल्याने येत्या काळात प्रमुख शहरांखेरीज अन्य भागातही डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात उभे होतील.
झारखंड व छत्तीसगड यामध्ये समोर येत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान व तंत्रज्ञान
आधारित सेवा क्षेत्रातील डेटा सेंटर्स उभे होत आहेत. स्मार्ट सिटी मोहिमेमुळेसुद्धा डेटा सेंटर्सची संपूर्ण देशभर उभारणी होत आहे. त्यातून येत्या काळात अतिरिक्त रोजगार निर्मित होताना दिसेल.
देशातील डेटा सेंटर्सची सर्वाधिक संख्या मुंबईत, डिजिटायझेशनच्या प्रभावाने संख्या वाढणार
देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहेत. सीबीआरई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे. देशभरातील एकूण डेटा सेंटर्समध्ये मुंबईचा वाटा २८ टक्के आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 04:27 AM2018-11-08T04:27:20+5:302018-11-08T04:27:37+5:30