Business : देशातील लोक सध्या जोरात ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोक सहजपणे गरजेच्या वस्तू घरपोच मागवतात. भाज्यांपासून ते औषधांपर्यंतच्या वस्तू एका क्लीकवर दारात येतात. एका सर्व्हेनुसार, स्विगी इन्स्टामार्टने जून 2021 पासून जून 2022 दरम्यान 90 लाखांपेक्षा जास्त यूजर्सना सर्व्हिस गिली. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये लोक मोठ्या संख्येने ऑनलाईन वस्तू खरेदी करतात.
ग्राहक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेडिकलसंबंधी वस्तूंच्याही ऑर्डर करत आहेत. एका सर्व्हेनुसार, गेल्या 12 महिन्यात मुंबईतील लोकांनी तब्बल 570 पटीने जास्त कंडोम ऑर्डर केले आहेत. तेच 2021 मध्ये इन्स्टामार्टला साधारण 20 लाख सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रअल कपल आणि टेम्पॉनच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
सर्व्हेनुसार, गेल्यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान या मेट्रो शहरात आयस्क्रीमची मागणीही 42 टक्क्क्यांनी वाढली आहे. हेही समजलं की, जास्तीत जास्त ऑर्डर रात्री 10 वाजेनंतर मिळाल्या. मेट्रो शहरांमध्ये लोकांना इस्टंट नूडल्सचे 56 लाख पॅकेड ऑर्डर केले. हैद्राबादमध्ये गरमीच्या दिवसात यूजर्सने फ्रेश ज्यूसच्या साधारण 27 हजार बॉटल ऑर्डर केल्या.
गेल्या दोन वर्षात अंड्यांची मागणीही वाढली आहे. बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईसहीत मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी गेल्या एका वर्षात सरासरी 60 लाख अंडी ऑर्डर केली. रिपोर्टनुसार, बंगळुरू आणि हैद्राबादच्या ग्राहकांनी नाश्त्यासाठी सर्वात जास्त अंडी ऑर्डर केली. डेअरी प्रॉक्ट्सचीही ऑनलाईन मागणी वाढली आहे.