Lokmat Money > बिझनेस न्यूज > Online Task Fraud : 'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा

Online Task Fraud : 'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा

Online Task Fraud : गेल्या काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही जर याबद्दल जागृत नसाल तर तुमचाही खिसा खाली होण्यास वेळ लागणार नाही.

By राहुल पुंडे | Published: October 1, 2024 12:33 PM2024-10-01T12:33:20+5:302024-10-01T12:34:18+5:30

Online Task Fraud : गेल्या काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही जर याबद्दल जागृत नसाल तर तुमचाही खिसा खाली होण्यास वेळ लागणार नाही.

Mumbai women lose Rs 53 lakh to task fraud Latest scam decoded | Online Task Fraud : 'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा

Online Task Fraud : 'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा

Online Task Fraud : "हॅलो, आमच्याकडे तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तुम्ही घरबसल्या पार्टटाईम जॉब करू शकता. यात तुम्हाला कोणतीही जॉइनिंग फी भरण्याची आवश्यकता नाही. दिवसात १५०-५ हजार रुपये कमवू शकता" असा मॅसेज आला तर सावध व्हा. कारण, एकट्या पुण्यातील हजारो तरुणांनी या ऑफरला बळी पडून कोट्यवधी रुपये गमावले आहेत. नुकतेच मुंबईतील एका महिलेने तब्बल ५३ लाख रुपयांचा गंडा या सायबर भामट्यांनी घातला. या गुन्हेगारांचा ट्रॅप इतका आकर्षक आहे, की कोणीही याला बळी पडू शकते. अशात हा सर्व प्रकार समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. तुमच्यासोबत अशा गोष्टी घडू नये आणि घडल्याचं तर काय करावे? याची माहिती असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम किंवा अगदी नियमित मॅसेंजरमध्ये असा संदेश आला असेल. तर तुम्ही कदाचित 'टास्क फ्रॉडमध्ये अडकू शकता. टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या ऑनलाइन मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना लक्ष्य करण्याची ही फसवी स्किम २०२३ पासून वाढत आहे. अलीकडेच मुंबईत एक गृहिणी आणि एका व्यावसायिक महिलेची अनुक्रमे २८.५१ लाख आणि २४.३६ लाख रुपयांची फसवणूक झाली.

कशी आहे मोडस ऑपरेंडी

  • पीडित व्यक्तीला सुरुवातीला एक आकर्षक पार्टटाईम वर्क फ्रॉम होम नोकरीची ऑफर दिली जाते. आपल्याला कोणतीही इंव्हेस्टमेंट करायची नसून ऑनलाईन टास्क पूर्ण करून आपल्याला पैसे कमवायची संधी असल्याचे सनगण्यात येते. त्यानंतर कधी व्हिडिओ पाहण्यासाठी सांगण्यात येते, कधी लाईक करण्यासाठी तर कधी शेअर करण्यासाठी सांगण्यात येते. 
  • असे वेगवेगळे टास्क देऊन सुरुवातीला पीडितेच्या अकाउंटवर १५० ते २०० रुपये लगेच ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर आमच्या मोठ्या प्लॅनमध्ये सहभागी झाला तर आपणाला लाखो रुपयांचे पेमेंट मिळेल असे आमिष दाखविण्यात येते.
  • हळूहळू, पीडितांना जास्त रिटर्न देण्याचे आश्वासन देऊन प्रीपेड टास्क करण्यास सांगितले जाते.
  • मनी ट्रान्सफर : गृहिणीने फक्त ३ दिवसांत ४ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २८.५१ लाख रुपये ट्रान्सफर केले.

 

मुंबईतील एका ४४ वर्षीय व्यावसायिक महिलेला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी काही टास्कचे तब्बल ५६ हजार रुपये तिच्या खात्यात पाठवले. तिचा विश्वास बसल्यानंतर तिने आणखी काही प्रीपेड टास्कसाठी ८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर केली. फेब्रुवारीमध्ये, पुण्यातील एक तंत्रज्ञ, एक फर्म व्यवस्थापक आणि इतर ६ जणांनी विविध टास्क फ्रॉड योजनांमध्ये एकत्रितपणे तब्बल १ कोटी ४ लाख कोटी रुपये गमावले.

घोटाळ्याचे प्रमाण
टास्क फ्रॉडमुळे संपूर्ण भारतामध्ये लक्षणीय आर्थिक नुकसान झाले आहे. उदाहरणार्थ, पुणे शहर पोलिसांच्या सायबर सेलनुसार, मार्च २०२३ पासून टास्क फ्रॉडमध्ये पुणेकरांचे २७.२३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बेंगळुरू पोलिसांनी २०२३ च्या नऊ महिन्यांत फसवणूक करणाऱ्यांकडून तब्बल ४७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली. एकट्या दिल्लीत जानेवारी २०२३ मध्ये ३०,००० लोकांची २०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

स्वतःचे संरक्षण कसे करावे

  • ऑनलाइन कामांसाठी सुलभ पैसे देणाऱ्या अशा मॅसेजेसपासून दूर राहा.
  • अवास्तव परतावा देणाऱ्या नोकरीच्या ऑफर टाळा.
  • जास्त पगाराची कामे करण्याचे आश्वासन देणाऱ्या कोणालाही पैसे पाठवू नका.
  • अधिकृत वेबसाइट किंवा ॲप्सद्वारे नोकरीच्या ऑफर आणि गुंतवणुकीच्या संधींची पडताळणी करा. 
  • लॉगिन क्रेडेन्शियल, वैयक्तिक, संवेदनशील किंवा आर्थिक माहिती अज्ञात व्यक्तींसोबत, विशेषतः मेसेजिंग ॲप्सवर कधीही शेअर करू नका.
  • अनोळखी व्यक्तींच्या विनंतीनुसार अनोळखी फाइल्स किंवा ॲप्स डाउनलोड करणे टाळा.
  • सायबर फसवणुकीच्या घटनांची सायबर क्राइम पोर्टल https://www.cybercrime.gov.in वर तक्रार करा किंवा मदतीसाठी 1930 वर कॉल करा.

Web Title: Mumbai women lose Rs 53 lakh to task fraud Latest scam decoded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.