Lokmat Money > बिझनेस न्यूज > बालपणापासून संगीताची तालीम आवश्यक

बालपणापासून संगीताची तालीम आवश्यक

- सितारवादक शुभेंद्र आणि सास्कीया राव : पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण

By admin | Published: February 13, 2015 11:10 PM2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30

- सितारवादक शुभेंद्र आणि सास्कीया राव : पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण

Music training is necessary since childhood | बालपणापासून संगीताची तालीम आवश्यक

बालपणापासून संगीताची तालीम आवश्यक

-
ितारवादक शुभेंद्र आणि सास्कीया राव : पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण
ताराचंद राय : पाश्चात्य वाद्य चेलोला भारतात लोकप्रिय करण्यासाठी झटणाऱ्या मूळ हॉलंडच्या निवासी सास्कीया राव आणि त्यांचे पती ज्येष्ठ सितारवादक शुभेन्द्र राव विविध संगीत महोत्सवात आपल्या सादरीकरणाने रसिकांना जिंकत आहे. हे दांपत्य नागपुरात पं. सी. आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी आले असता त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले, संगीताचा संस्कार लहानपणापासूनच मुलांच्या मनावर होणे आवश्यक आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करायचे असले तरी संगीताचे शिक्षण बालपणापासूनच देणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करु शकतो.
लहान मुांना संगीत शिकविले तर तेच आपले भविष्यातील कलावंत आणि रसिक म्हणून तयार होत असतात. मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी शुभेंद्र आणि सास्कीया फाऊंडेशनची स्थापना केली आहे. याप्रसंगदी सास्कीया म्हणाल्या, शुभेंद्र यांच्या सितारवादनाच्या प्रेमात पडून त्यांच्या आयुष्याची भागीदार होण्यातच मला समाधान मिळाले. १५ वर्षापासून भारतात असल्याने हिंदीही आत्मसात झाली. चेलो आणि सितारचे फ्युजन सादर करणाऱ्या राव दांपत्याने मात्र शास्त्रीय संगीत हीच प्राथमिकता असल्याचे सांगितले. शुभेन्द्र राव म्हणाले, पं. रवीशंकर यांचे शिष्य असल्याने लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढलेल्या असतात. त्यांच्या आशीर्वादाने अनेक संधी मला मिळत आहेत. पण गुणवत्ता नसेल तर आपण या क्षेत्रातून बाहेर फेकल्या जायला वेळ लागत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Music training is necessary since childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.