मुथ्थूट ग्रुपचे अध्यक्ष एम जी जॉर्ज (MG George) यांचे वयाच्या 72 व्या वर्षी नवी दिल्लीमध्ये निधन झाले. (Muthoot Group Chairman MG George Muthoot passed away today in Delhi.)
त्यांनी तरुण वयात फॅमिली बिझनेस सांभाळला होता. 1979 मध्ये ते व्यवस्थापकीय संचालक बनले होते. 1993 मध्ये त्यांनी मुथ्थूट ग्रुपचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यांच्या नेतृत्वात Muthoot Finance Ltd ने मोठे यश संपादन केले. मुथ्थूट ग्रुप भारतातील सर्वात मोठी गोल्ड लोन कंपनी बनली. सध्या या कंपनीचे बाजारमुल्य 51,000 कोटी असून 8,722 कोटी उत्पन्न आहे. मुथ्थूटच्या जगभरात 5000 हून अधिक शाखा आहेत.
सायंकाळी ते घरातील जिन्यावरून घसरून पडले होते. यामुळे त्यांना अत्यावस्थेत दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सायंकाळी 7 च्या सुमारास मृत घोषित केले.