Join us

Change Investing : माहितीये काय आहे 'चेंज इन्व्हेस्टिंग'?; म्युच्युअल फंड स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 9:38 PM

Change Investing : छोट्या रकमेतही आपल्याला गुंतवणूक करता येते. अनेक अॅप्स ही सुविधा देत आहेत.

Change Investing : गुंतवणुकीबद्दल (Investment) विचारलं तर अनेकांची उत्तरं सध्या नको नंतर पाहू किंवा आता पैसे नाहीत, अशीच एकसारखी असतात. आपल्याकडे गुंतवणूकीसाठी अधिकचा पैसा अशी वेळ कधीच येत नाही आणि हे एक सत्यही आहे. पण छोट्या रकमेतही आपल्याला गुंतवणूक करता येते. अनेक अॅप्स ही सुविधा देत आहेत. यामध्ये Appreciate, Jar आणि Niyo यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. यालाच चेंज इन्व्हेस्टिंग असं नाव देण्यात आलंय. पाहूया हे नक्की आहे तरी काय?

आपल्याकडे काही थोडेफार पैसे शिल्लक असतील तर त्याला 'चेंज' असं म्हणतो आणि यालाच चेंज इन्व्हेस्टिंग असं म्हटलं जातं. तुम्ही खरेदी करता, वीज बिल भरता किंवा शाळेची फी भरता, जेव्हा तुम्ही हे पेमेंट करता तेव्हा फिनटेक कंपन्या त्यावर लक्ष ठेवतात. त्यानंतर त्या कंपन्या तुम्हाला छोटी रक्कम गुंतवण्यास सांगतात. वास्तविक, हे तुमचे खरेदी, वीज बिल, शाळेची फी इत्यादी भरल्यानंतर उरलेले किरकोळ पैसे आहेत.

कसं काम करतं?ही अॅप्स एक रक्कम निश्चित करतात. ही राऊंड-ऑफ रक्कम आहे, जी १० रुपये, ५० रुपये किंवा १०० रुपये असू शकते. अॅप्स काय ऑफर करतात आणि तुम्ही काय निवडता यावर ते अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग खाते वापरून पैसे खर्च करता तेव्हा अॅप तुमची भरलेली रक्कम आणि नेक्स्ट राऊंडऑफच्या फरकाची गणना करते. प्रत्येक वेळी तुम्ही खरेदी करता तेव्हा ही गणना केली जाते. जेव्हा हा फरक हळूहळू १००, ५०० किंवा १००० पर्यंत वाढतो तेव्हा अॅप तुम्हाला हे पैसे फायनॅन्शिअल असेटमध्ये गुंतवण्यास सांगतं. हे फायनॅन्शिअल असेट अॅपच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

तरुणांसाठी अॅप्स?Niyo App तुमच्या ट्रान्झॅक्शनला पुढील १०० रुपयांमध्ये राऊंड ऑफ करतं. प्रत्येक हा फरक एका ठिकाणी जमा होतं. परंतु नंतर मोठी रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. तुम्ही जोखीमीच्या क्षमतेनुसार फंडाची निवड करू शकता. जर तुमची रक्कम ५०० रुपयांच्या वर गेली तर ती म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. बहुतांश म्युच्युअल फंड्स ५०० रुपयांच्या किमान गुंतवणूकीची सुविधा देतात.

"इन्व्हेस्ट द चेंज फीचर तरुणांसाठी उत्तम आहे. ते अधिक डिजिटल व्यवहार करतात. आठवड्यातून अनेक वेळा ते १००० किंवा १००-१०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे अनेक व्यवहार करतात. ज्यांना दर महिन्याला आपल्या गुंतवणूकीबाबत लक्षात ठेवणं कठीण जातं त्या गुंतवणूकदारांसाठीही हे चांगले आहे," असं मत पर्सनल फायनान्स तज्ज्ञ पारिजात गर्ग यांनी व्यक्त केलं.

कसा कराल वापर?Niyo चे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम हे अॅप इंस्टॉल करणे आवश्यक आहे. त्यानंतर NiyoX बचत खाते उघडावे लागेल. बँक तुमचे नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि UPI च्या माध्यमातून होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवते. त्यानंतर गुंतवणूकीसाठी चेंज एकत्र केले जातात. जेव्हा ती एक मोठी रक्कम बनते तेव्हा ती म्युच्युअल फंडात गुंतवली जाते.

"तुम्ही अॅपवर कधीही म्युच्युअल फंड स्कीम बदलू शकता. यासाठी तुम्हाला सेव्ह द चेंज फीचर वापरावे लागेल. जर तुम्ही स्कीम बदलली नाही, तर तुमचे पैसे पूर्वनिर्धारित स्तरावर पोहोचल्यावर तुमचे पैसे त्या योजनेत जातील," अशी माहिती निओचे हेड ऑफ स्ट्रॅटेजी स्वप्नील भास्कर यांनी दिली. 

निओ तुम्हाला त्यांच्याकडे बचत खाते उघडण्यास सांगतो. मग ते त्याच्या नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे खर्च करण्यास सांगते. हे तुमचे NeoX बचत खाते ट्रॅक केलं जातं. मग ते तुम्हाला चेंज इन्व्हेस्टिंग फीचर अॅक्टिव्हेट करण्यास सांगते.

वापर करावा का?हे कॉन्सेप्ट भारतात नवं आहे. हे फिनटेक अॅपही नवं आहे. परंतु हे तुम्हाला छोटी रक्कम गुंतवण्याची सुविधा देतं. परंतु याद्वारे तुम्ही दीर्घ काळातही अधिक नफा मिळवू शकत नाही. हे अॅप तरुणांना टार्गेट करतं. परंतु त्यांनाही गुंतवणूकीबाबत काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. "कोणतं अॅसेट तुमच्यासाठी चांगलं आहे हे तुम्हाला माहित करून घेणं आवश्यक आहे. फिनटेक कंपन्या भविष्यात एसेट क्लास वाढवू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक पर्यायही मिळतील. त्यामुळे ५,१०,१०० रुपये जोडून लाखो रुपये जमवण्याच्या मार्केटिंग कॅम्पेनवर लक्ष देऊ नये," असं गर्ग म्हणाले. टीप : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :गुंतवणूक