Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमाईची संधी! नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता

कमाईची संधी! नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने इक्विटी श्रेणीमध्ये ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 क्वालिटी 30 ETF हा नवीन फंड लॉन्च केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:33 PM2023-07-21T17:33:00+5:302023-07-21T17:35:50+5:30

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने इक्विटी श्रेणीमध्ये ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 क्वालिटी 30 ETF हा नवीन फंड लॉन्च केला आहे.

mutual fund nfo icici prudential nifty 200 quality 30 etf subscription opens minimum investment 1000 rupees check other details | कमाईची संधी! नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता

कमाईची संधी! नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता

मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने इक्विटी श्रेणीमध्ये ICICI प्रुडेन्शियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ETF हा नवीन फंड लॉन्च केला आहे. ही एक ओपन एंडेड योजना आहे. योजनेचे सदस्यता २१ जुलै २०२३ पासून सुरू झाले आहे. यामध्ये गुंतवणूकदार २६ जुलै २०२३ पर्यंत बोली लावू शकतात. 'ही योजना दीर्घकालीन सेव्हींगसाठी उपयुक्त ठरू शकते, असं म्युच्युअल फंड हाऊसने म्हटले आहे. 

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

म्युच्युअल फंड हाऊसने सांगितले की,  तुम्ही ICICI प्रुडेन्शियल निफ्टी २०० क्वालिटी ३० ETF स्कीममध्ये किमान १,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयेच्या पटीत गुंतवणूक करू शकता. योजनेचा बेंचमार्क निर्देशांक NIFTY २०० गुणवत्ता ३० TRI आहे. या योजनेत गुंतवणुकीचे उद्दिष्ट अंतर्निहित बेंचमार्कनुसार परतावा निर्माण करणे हा आहे. ही योजना आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करेल याची कोणतीही हमी नाही. 

म्युच्युअल फंड हाऊसच्या मते, असे गुंतवणूकदार ज्यांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय असू शकतो. एक्सचेंज ट्रेडेड फंडचे उद्दिष्ट NIFTY200 गुणवत्ता ३० निर्देशांकाच्या परताव्याच्या अनुषंगाने परतावा जनरेट करणे आहे. गुंतवणुकदाराला या योजनेबाबत काही शंका असल्यास त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

Web Title: mutual fund nfo icici prudential nifty 200 quality 30 etf subscription opens minimum investment 1000 rupees check other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.