Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

या फंडाने केवळ 10,000 रुपयांची मासिक एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:23 PM2023-07-07T20:23:34+5:302023-07-07T20:26:28+5:30

या फंडाने केवळ 10,000 रुपयांची मासिक एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

Mutual fund nippon india growth fund give bumper return on 10000 monthly sip investment turn into more than 13 crore | म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल


अनेकांना वाटत असते की, आपल्या कमाईतील काही हिस्सा बचत करून, अशा ठिकाणी गुंतवावा, जेथून मोठा परतावा मिळेल. या बाबतीत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP चा इतिहास चांगला आहे. यांपैकी एक म्हणजे, मिड कॅप फंड Nippon India Growth Fund, या फंडाने केवळ 10,000 रुपयांची मासिक एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

निप्पॉन इंडियानं दिला छप्परफाड परतावा - 
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth Fund) सुरू होऊन जवळपास 27 वर्ष झाली आहेत. हा फंड ऑक्टोबर 1995 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या फंडाने जवळपास 22 टक्क्यांचा सीजीआर दिला आहे. या अनुशंगाने, जर एखाद्याने या फंडात सुरुवातीपासूनच 10,000 रुपयांची मासिक SIP केली असती तर, आज तो कोट्यधीश झाला असता. त्याच्या जवळ आता 13 कोटी रुपयांहूनही अधिकचा फंड तयार झाला असता.  

10000 रुपयांच्या एसआयपीचे झाले 13 कोटी रुपये -
एसआयपी कॅलक्युलेटरनुसार, या 27 वर्षांच्या कालावधीत या फंडाच्या माध्यमाने देण्यात आलेल्या सीजीआरला काउंट केल्यास, 10,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीचे आता जवळपास 32,40,000 रुपयांचा फंड होतो. यावर 22.20 टक्क्यांच्या हिशेबाने परतावा मोजल्यास हा आकडा 13.67 कोटींवर पोहोचतो. अशा प्रकारे गुंतवणूकदाराची एकून रक्कम 13.67 कोटी रुपये होते.

शॉर्ट टर्ममध्येही चांगला परतावा -
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये CGR चा हा डेटा 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतचा आहे. केवल लॉन्ग टर्ममध्येच नाही, तर शॉर्ट टर्ममध्येही या फंडाने जबरदस्त परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडने (Mutual Fund) गेल्या तीन वर्षांत 27.53 टक्क्यांच्या सीजीआरसह 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीच्या एकूण 3.60 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 5.31 लाख रुपये केले आहेत.

(टीप - येथे केवळ म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Mutual fund nippon india growth fund give bumper return on 10000 monthly sip investment turn into more than 13 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.