पैसे कमविणे आणि ते खर्च करणे आजकाल सोपे झाले आहे. परंतू तोच पैसा वाचवून तो योग्य ठिकाणी गुंतविणे आज कठीण काम आहे. कधी कोणती योजना वर येईल, कधी कोणती कंपनी बुडेल याची शाश्वती राहिलेली नाही. मात्र, गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला आहे, त्यात लवकरात लवकर गुंतवणूक करणे हे सर्वात महत्वाचे आहे. काही तज्ज्ञांनुसार तुम्ही नोकरीला लागला की त्याचवेळेपासून गुंतवणूक सुरु करायला हवी.
गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. त्यांची त्यांची एक विशेषता आणि महत्व आहे. गुंतवणूक सल्लागार नेहमी लहानपणापासूनच गुंतवणूक सुरू करण्याची शिफारस करतात. कारण त्यात तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीचे लक्ष्य आणि अधिक जोखीम पत्करण्याची संधी मिळते. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घ मुदतीत करोडो रुपये कमवू शकता.
आत्तासाठी, आम्ही तुम्हाला एक ढोबळ गणना दाखवत आहोत. समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली. जर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये वाचवले, म्हणजे दररोज 167 रुपये आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 11.33 कोटी इतकी मोठी रक्कम असेल. लक्षात ठेवा की SIP मध्ये, तुम्हाला दरवर्षी 10% ने वाढ करावी लागेल. हे समजून घ्या...
गुंतवणुकीचे गणित...
- मासिक गुंतवणूक रु 5000
- अंदाजे परतावा 14%
- वार्षिक SIP 10% वाढ
- एकूण गुंतवणूक कालावधी 35 वर्षे
- एकूण गुंतवणूक रु. 1.62 कोटी
- एकूण परतावा रु. 9.70 कोटी
- एकूण मिळणारी रक्कम रु. 11.33 कोटी
हे लक्षात ठेवा...
एक गोष्ट लक्षात ठेवा की दरवर्षी तुमचा पगार वाढला की तुम्हाला त्यानुसार तुमची SIP गुंतवणूक वाढवावी लागेल. 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत, तुम्हाला चक्रवाढीचे प्रचंड फायदे मिळतात. म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी वार्षिक १२-१६ टक्के परतावा देतात. जेव्हा तुम्ही दरवर्षी तुमची गुंतवणूक वाढवत राहाल, तेव्हा तुम्ही निवृत्तीच्या खूप आधी करोडपती व्हाल.