Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

निवृत्तीनंतर आपण आपलं जीवन सुखात जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुमच्याकडे रिटायरमेंटनंतर खूप मोठी रक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:02 PM2023-10-30T12:02:07+5:302023-10-30T12:07:09+5:30

निवृत्तीनंतर आपण आपलं जीवन सुखात जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुमच्याकडे रिटायरमेंटनंतर खूप मोठी रक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे.

mutual fund sip INVESTMENT FORMULA WILL MAKE YOU A MILLIONAIRE A LIFE OF WORLD COMFORT AFTER RETIREMENT | गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

गुंतवणूकीचा 'हा' फॉर्म्युला तुम्हाला बनवेल कोट्यधीश, रिटायरमेंटनंतर जगाल आरामाचं आयुष्य

How to Become Crorepati: निवृत्तीनंतर आपण आपलं जीवन सुखात जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुमच्याकडे रिटायरमेंटनंतर खूप मोठी रक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे. याच रकमेच्या मदतीनं तुम्ही वृद्धापकाळात तुमच्या सर्व गरजा आणि आवडीनिवडी पूर्ण करू शकता. वृद्धापकाळात तुमचं शरीर फारसं कष्ट करू शकणार नाही आणि अशा वेळी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही.

परंतु रिटायरमेंटसाठी मोठा फंड (Huge Corpus) असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पहिल्या कमाईसोबतच सेव्हिंग्स आणि गुंतवणूकीची सुरुवात करणंही गरजेचं आहे. या हिशोबानं रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे जी रक्कम असेल, ती त्यावेळच्या हिशोबानं चांगलं मूल्य असणं गरजेचं आहे. वेळेनुसार महागाई वाढेल आणि त्याप्रमाणे कॅलक्युलेश करून तुम्हाला फंड जमा करावा लागणार आहे. जर तुम्हाला रिटायरमेंटसाठी मोठी रक्कम जोडायची असेल तर गुंतवणूकीच्या बाबतीत 10 Percent for Retirement च्या फॉर्म्युलाचा वापर करणं आवश्यक आहे. हे तुमच्यासाठी मदतीचं ठरू शकतं आणि तुम्ही कोट्यवधींचे मालकही बनू शकता. पाहूया कसं.

10 Percent for Retirement चा फॉर्म्युला
10 Percent for Retirement फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमच्या पहिल्या कमाईसोबतच सॅलरीतील मग ती कमी असो किंवा जास्त १० टक्के रक्कम गुंतवण्यास सुरुवात करू शकता. यानंतर दरवर्षी १० टक्क्यांच्या हिशोबानं गुंतवणूक वाढवा. उदाहरणाद्वारे समजायचं झाल्यास तुमची पहिली सॅलरी ३० हजार रुपये आहे. त्याचे १० टक्के म्हणजे ३ हजार रुपयांनी गुंतवणूक सुरू करा. एका वर्षानंतर दरवर्षी ३ हजारांत १० टक्क्यांनुसार ३०० रुपये आणखी वाढवा. यानुसार दरवर्षी गुंतवणूकीच्या रकमेत १० टक्क्यांची वाढ करा आणि रिटायरमेंटपर्यंत ती सुरू ठेवा.

असे बनाल कोट्यवधींचे मालक
10 Percent for Retirement च्या फॉर्म्युलानुसार तुम्ही २५ व्या वर्षी आपल्या पहिल्या कमाईच्या हिशोबानं ३ हजारांची एसआयपी सुरू केली. ३५ वर्षांनंतर तुम्ही ६० वर्षांचे व्हाल. अशातच १० टक्के वाढीसह ही गुंतवणूक तुम्ही ३५ वर्षांपर्यंत कायम ठेवाल. अशात ३५ वर्षांत तुम्ही ९७,५६,८७७ रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्क्यांच्या हिशोबानं ४,३५,४३,९४२ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशातच ३५ वर्षानंतर तुम्ही एकूण ५,३३,००,८१९ रुपयांचे मालक असाल. जर तुम्ही हीच गुंतवणूक याच फॉर्म्युलानुसार ३० वर्षांपर्यंत कायम ठेवा, तर १२ टक्क्यांच्या रिटर्ननुसार तुम्ही २,६५,०२,३७१ रुपये सहजरित्या एसआयपीद्वारे जोडू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: mutual fund sip INVESTMENT FORMULA WILL MAKE YOU A MILLIONAIRE A LIFE OF WORLD COMFORT AFTER RETIREMENT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.