Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोच्या काळातही Mutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ

कोरोच्या काळातही Mutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ

mutual funds: देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने नवे शिखर गाठले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:58 PM2021-04-17T16:58:01+5:302021-04-17T17:00:21+5:30

mutual funds: देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने नवे शिखर गाठले आहे.

mutual funds assets new high end of rupees 314 lakh crore in 2020 21 | कोरोच्या काळातही Mutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ

कोरोच्या काळातही Mutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूक; तब्बल ४१ टक्क्यांची वाढ

HighlightsMutual Funds मध्ये विक्रमी गुंतवणूकम्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ वाढलाएकूण मालमत्तेत एक टक्का घसरण

मुंबई: देशातील जनतेला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुच्युअल फंडातील गुंतवणुकीवर आताच्या घडीला अधिक भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडत असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे मात्र, देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने नवे शिखर गाठले आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मुच्युअल फंड गुंतवणुकीत ४१ टक्के वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. (mutual fund assets new high end of rupees 314 lakh crore in 2020 21)

सर्व म्युच्युअल फंड योजनांमधील एकूण मालमत्ता तब्बल ३१.४३ लाख कोटी रुपये इतक्या विक्रमी पातळीवर गेली आहे. गतवर्षी आलेल्या कोरोना संकटाने भांडवली बाजाराची परिस्थिती कठीण झाली.  शेअर बाजारात मोठी घसरण होऊन त्याचे पडसाद म्युच्युअल फंड उद्योगावरही उमटले होते. मात्र, त्यानंतर हळूहळू म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे कल वाढलेला पाहायला मिळाला. 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ वाढला

वर्षभर म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. क्रिसिल या पत मानांकन संस्थेच्या अहवालानुसार मार्च महिनाअखेर म्युच्युअल फंडातील एकूण मालमत्ता ३१.४३ लाख कोटी इतकी झाली आहे. मार्च महिन्यात फंडातून गुंतवणूक काढून घेण्यात आल्याचे दिसून आले. मार्च महिन्यात ओपन एंडेड डेट फंडामधून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली. ज्यामुळे म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेत एक टक्का घसरण झाल्याचे क्रिसिलने म्हटले आहे. 

LIC कर्मचाऱ्यांना दुप्पट लाभ; २५ टक्के पगारवाढ, ५ दिवसांचा आठवडा आणि...

एकूण मालमत्तेत एक टक्का घसरण

मार्च महिन्यात म्युच्युअल फंडामधून २९७४५ कोटी काढून घेण्यात आले . ज्यामुळे एकूण मालमत्ता ३१.४३ लाख कोटी झाली आहे. फेब्रुवारी अखेर म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता ३१.६४ लाख कोटी होती. वार्षिक आधारावर मात्र २०२०-२१ हे वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी चांगले राहिले, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, सर्वच म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक ओघ मागील वर्षभरात वाढला. त्यामुळे म्युच्युअल फंडाची एकूण संपत्ती ४१ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षभरात २.०९ लाख कोटींची गुंतवणूक झाली. ओपन एंडेड डेट फंडामधून वर्षभरात ५२५२८ कोटीची गुंतवणूक काढून घेण्यात आली. मार्च २०२० नंतर ही सर्वाधिक रक्कम ठरली.
 

Web Title: mutual funds assets new high end of rupees 314 lakh crore in 2020 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.