मुंबई : म्युच्युअल फंड क्षेत्राचा आवाका दिवसेंदिवस वाढता आहे. शेअर बाजारातही सर्वाधिक गुंतवणूक सध्या म्युच्युअल फंडांकडून होत आहे. विमान कंपन्यांपेक्षाही अधिक पैसा म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात गुंतविल्याचे ‘आयसीआरए’ या संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे. विमा व म्युच्युअल फंड या दोन्ही क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैसा घेऊन तोे शेअर बाजारात गुंतवत असतात. विमा कंपन्यांनी आजवर ९ लाख २२ हजार कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत.
पण त्या तुलनेत म्युच्युअल फंडांनी केलेली गुंतवणूक ९ लाख ३२ हजार कोटींपर्यत पोहचली आहे. आर्थिक क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाल्याचे आयसीआरएचे म्हणणे आहे.
म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूकदारांचा आकडा नोव्हेंबरअखेरीस ७ कोटी ९७ लाखांवर पोहोचला. म्युच्युअल फंडात नोव्हेंबर महिन्यात ७ लाख नवे गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. नोव्हेंबर २०१७ च्या तुलनेत गुंतवूणकदारांमध्ये ०.८८ टक्के वाढ झाली. तर वार्षिक वाढ १८.५८ टक्के इतकी झाली. यापैकी ९० टक्क्याहून अधिक गुंतवणूकदार हे ‘इक्विटी’ अर्थात शेअर बाजारात पैसा गुंतविण्यास इच्छूक असलेले आहेत.
देशभरातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आकडा नोव्हेंबर २०१८ अखेर २४.०३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यात ८.०८ टक्के वाढ झाली. यात झालेली वार्षिक वाढ ५.४५ टक्के असल्याचे अभ्यासात समोर आले.
शेअर्समध्ये विमा कंपन्यांपेक्षा म्युच्युअल फंडांचा पैसा जास्त; वार्षिक ५ टक्क्यांची वाढ
म्युच्युअल फंड क्षेत्राचा आवाका दिवसेंदिवस वाढता आहे. शेअर बाजारातही सर्वाधिक गुंतवणूक सध्या म्युच्युअल फंडांकडून होत आहे. विमान कंपन्यांपेक्षाही अधिक पैसा म्युच्युअल फंडांनी शेअर बाजारात गुंतविल्याचे ‘आयसीआरए’ या संस्थेच्या अभ्यासात समोर आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:31 AM2018-12-27T06:31:01+5:302018-12-27T06:31:22+5:30